Join us
Daily Top 2Weekly Top 5

 बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली लिसा हेडन, क्षणात फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 15:15 IST

लिसा लवकरच दुस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती.

ठळक मुद्दे लिसाने आक्टोबर 2016 मध्ये तिचा बॉयफ्रेन्ड डिनो ललवानी याच्याशी लग्न केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन हिने फार कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.  दीर्घकाळापासून कुठल्याही बॉलिवूड चित्रपटात झळकली नसली तरी ती सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या लिसा प्रेग्नंट आहे. लवकरच ती दुस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. आता तिने तिच्या बेबी बम्पचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत लिसा बिकिनीत दिसतेय.

या फोटोंमध्ये लिसा ब्लॅक बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

  एका फोटोमध्ये लिसाचा मुलगा तिच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे.   

हे सर्व फोटो लिसाच्या व्हेकेशनचे आहेत. याठिकाणी लिसा पती डिनो लालवानी आणि मुलगा जॅक लालवानी यांच्यासोबत क्लालिटी टाइम स्पेंड करत आहे.  

‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये लिसा अखेरची दिसली होती. यात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि फवाद खान आदी मुख्य भूमिकेत होते.

 मुळात लिजाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. चेन्नईत जन्मलेली लिसा बरीच वर्षे विदेशात राहिलीय. आधी आॅस्ट्रेलिया, मग अमेरिकेत ती राहिली. यानंतर अभिनेत्री बनण्यासाठी तिने मुंबई गाठली. बॉलिवूडमध्ये ती आयशा,क्वीन, हाऊसफुल3, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक सिनेमांत दिसली.

 लिसाने आक्टोबर 2016 मध्ये तिचा बॉयफ्रेन्ड डिनो ललवानी याच्याशी लग्न केले होते. डिनो हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्यानंतर काही दिवसातच तिने पहिल्या प्रेग्नन्सीची माहिती दिली होती. लिसा 17 मे 2017 मध्ये पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. तिच्या पहिल्या मुलाचे नाव जॅक आहे. 

टॅग्स :लीसा हेडन