Join us

Video: अंबानींच्या पार्टीत छोट्या राहा कपूरने वेधलं लक्ष, तिचा क्युटनेस पाहून नेटकरी घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 5:24 PM

ख्रिसमसला पहिल्यांदा तिची झलक सोशल मीडियावर दिसली. तेव्हापासून राहावरुन कोणाचीच नजर हटत नाहीए.

रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री वेडिंगचा जल्लोष सध्या जामनगरमध्ये सुरु आहे. अख्खं बॉलिवूड सध्या जामनगरमध्येच अवतरलं आहे. पहिल्या दिवशी हॉलिवूडची स्टार गायिका रिहानाने आपल्या परफॉर्मन्सने स्टेजवर आग लावली. तर काल जामनगरचं संपुर्ण वातावरण बॉलिवूडमय झालेलं पाहायला मिळालं. कालच्या सोहळ्यातील रणबीर आणि आलियाची लेक राहाचा क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची (Alia Bhat) मुलगी राहा (Raha Kapoor)एक वर्षाची आहे. ख्रिसमसला पहिल्यांदा तिची झलक सोशल मीडियावर दिसली. तेव्हापासून राहावरुन कोणाचीच नजर हटत नाहीए. निळे डोळे, चेहऱ्यावरील निरागस भाव यामुळे ती आतापासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच राहाचा अंबानींच्या पार्टीतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये आलिया राहाला कडेवर घेऊन येत आहे. तर समोर अनंत अंबानी आहे. राहाला पाहताच अनंत अंबानी तिचे लाड करतात. तेव्हा राहा आधी प्रतिसाद देते आणि नंतर इकडे तिकडे पाहायला लागते. इंटरनेटवर सध्या राहाच्या क्युटनेसचीच चर्चा आहे.

आलिया, राहा आणि अनंत अंबानींचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'अख्खं बॉलिवूड एकीकडे आणि राहा एकीकडे', 'आलिया आणि राहा दोघीही खूप गोड दिसत आहेत','नजर ना लगे' अशा कमेंट्स मायलेकीसाठी आल्या आहेत. 

राहा कपूरचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. कपूर कुटुंबाचे सर्वगुण तिच्यात आलेले स्पष्ट दिसतात. गोरी त्वचा, निळेशार डोळे यामुळे तिच्यात आजोबा ऋषी कपूर यांचीही झलक दिसते असं म्हणतात. राहाला सध्या सगळीकडूनच खूप प्रेम मिळत आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरमुकेश अंबानीजामनगरगुजरात