Lock Upp : एंटरटेनमेंटच्या दुनियेत सध्या कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोची चांगलीच चर्चा होतेय. शोमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी रोज नवे धक्कादायक खुलासे करत आहेत. शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) हिनेही असंच एक शॉकिंग सीक्रेट उघड केलं आहे. तिच्या या खुलाशाने इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.लॉक अपच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात मंदानाने होस्ट कंगनासमोर रडत रडत आपली आपबीती सांगितली. एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी मंदानाने सर्वप्रथम बजर वाजवला. यानंतर तिने जे काही सीक्रेट शेअर केलं ते ऐकून सगळेच हैराण झालेत. अगदी कंगनाही ऐकून सुन्न झाली.
घटस्फोटानंतर मी रिलेशनशिपमध्ये होती...जेव्हा मी माझ्या पर्सनल आयुष्यात संघर्ष करत होते, पतीसोबत विभक्त होण्यासाठी झगडत होते, त्यावेळी मी एका सीक्रेट रिलेशनशिपमध्ये होते. मी एका मोठ्या दिग्दर्शकासोबत नात्यात होते. आमचं नातं खूप पुढे गेलं होतं. अगदी आम्ही पे्रग्नंसी सुद्धा प्लान केली होती. तो दिग्दर्शक महिलांच्या अधिकारांबद्दल बोलतो. अनेकांची प्रेरणा म्हणून मिरवतो. नात्यात असताना आम्ही पे्रग्नंसी प्लान केली. पण मी प्रेग्नंट राहिल्यावर तो बदलला.. असं सांगत मंदाना ढसाढसा रडली. तिला रडताना पाहून कंगनाही काही क्षण भावुक झाली. पुढे मंदानाने सांगितले की, ‘मी भावनिकदृष्ट्या बाळासाठी तयार नाही, असं त्याने मला सांगितलं. माझ्या एका मित्रासोबत मिळून मला गर्भपातासाठी कसं राजी करायचं, याचा प्लान त्याने केला. मला पण एक निर्णय घ्यायचा होता. अखेर मी गर्भपातासाठी तयार झाले. पण यामुळे मी पूर्णपणे खचले होते...माझा संसार आधीच उद्ध्वस्त झाला होता. त्या परिस्थितीत मी अॅबॉर्शनचा निर्णय घेतला. ’मंदानाने या दिग्दर्शकाचं नाव सांगितलं नाही. ‘मी त्याचं नाव सांगू इच्छित नाही. कारण माझ्या तोंडून त्याचं नाव घेण्याइतका तो लायकीचा नाही...,’ असं ती म्हणाली.
2017 मध्ये मंदानाने बिझनेसमॅन गौरव गुप्तासोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न वर्षभरही चाललं नाही. पाचच महिन्यांत मंदाना व गौरव वेगळे झालेत. मंदानाने गौरववर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.