मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप(Lock Upp) या शोची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमी दिसली. मंदानाच्या शोमधील एन्ट्रीने अनेकांना थक्क केले. अलीकडेच मंदानाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही रंजक किस्से शेअर केले आहेत. जे ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वैवाहिक आयुष्यात आलेल्या कटू आठवणीही मंदानाने सर्वांसमोर उघड केल्या आहेत.
कंगना राणौतच्या(Kanaga Ranaut) 'लॉक अप' या रिएलिटी शोमध्ये सहभागी अभिनेत्री मंदाना करीमीने पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. मंदानाने सांगितले की, वयाच्या २७ व्या वर्षी माझं लग्न झाले. त्याआधी आम्ही सात वर्षे एकमेकांना डेट केले. शोची स्पर्धक अजमाशी बोलताना मंदानाने याचा उल्लेख केला. आमचं एक सुंदर नाते होते. आम्ही अनेक अविस्मरणीय क्षण एकत्र घालवले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आम्ही वेगळे झालो. मात्र घटस्फोट २०२१ मध्ये झाला. मंदानाने पती गौरव गुप्तावर आरोप केले आहेत.
आम्ही वेगळे झाल्यानंतर माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध होते. मी त्या स्त्रियांना ओळखते. तेव्हा अजमाने तुला आधीच माहीत होते, मग तू त्याच वेळी घटस्फोट का घेतला नाहीस? असा प्रश्न केला. यावर मंदाना म्हणाली की, हे गुपित आहे. केवळ मलाच माहिती होते असं तिने सांगितले. मंदानाचा जन्म इराणमध्ये झाला होता. मात्र तिच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर तिने कायमचा देश सोडला. मंदानाने तिचं दु:खं पायल रोहतगीसोबत शेअर केले.
एकदा मित्राच्या लग्नासाठी मंदाना इराणला परतली होती. परंतु ती सहभागी होऊ शकली नाही. त्यानंतर मित्रांनी एका ट्रिपचं आयोजन केले. मंदानाला बाइक राइड करणे खूप आवडते. यावेळी तिचा गाडी चालवताना भीषण अपघातही झाला. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागले होते. उपचारावेळी मित्र हॉस्पिटलबाहेर वाट पाहत होते. एका व्हिलचेअरसोबत मित्र खेळत होते. मात्र त्यांच्यावर कुणी नजर ठेवून आहे हे माहिती नव्हते. पोलिसांना वाटलं की मुलांनी नशा केली आहे. त्यामुळे त्यांना अटक केली. त्यांना चाबकाचे फटके मारण्यात आले.
मंदानाच्या या खुलाशाने पायलही थक्क झाली. तिने मंदानाला विचारले की, ती वाचली का? याला उत्तर देताना मंदाना म्हणाली की, मला दुखापत झाली होती आणि तिचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे मला फटके मारण्यात आले नव्हते, पण मला मित्रांना मार खाताना बघायला लागले होते. यानंतर मी इराण कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला, मी अशा देशात राहू शकत नाही जिथे लोकांना अशी वागणूक दिली जाते असं मंदाना म्हणाली.