कंगना राणौत होस्ट करत असलेला ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. कंगनाच्या या लॉकअपमध्ये एकापेक्षा एक भारी स्पर्धक सहभागी झाले आहेत. पूनम पांडे (Poonam Pandey) त्यापैकीच एक. पूनम पांडे ही ‘लॉक अप’मधील एक दमदार स्पर्धक आहे. पण ताज्या एपिसोडमध्ये हीच पूनम भावुक झाल्याचं पाहायला मिळाल. तिचा इमोशनल ब्रेकडाऊन पाहून सगळेच हैराण झालेत. प्रकृती बरी नसल्यानं पूनम टास्कमध्ये सहभागी होऊ शकली नाही. यानंतर ती बाथरूम एरियात अगदी धाय मोकलून रडताना दिसली.
तिच्या टीमचे सर्व स्पर्धक परफॉर्म करत होते आणि ती एकटी बाथरूम एरियात रडत होती. पायल रोहतगीने तिला रडताना पाहून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण पूनमचे अश्रू थांबले नाही. नंतर ती स्वत:वरच चिडलेली दिसली.
‘माझ्यासोबतच असं का होत आहे? मला कधी अशी समस्या नव्हती. मी स्वत: तिरस्कार करते. मी एक अॅथलिट आहे आणि मी टास्क करू शकत नाहीये. मी नॉर्मल नाहीये,’असं पूनम म्हणाली.
नवी दिल्लीतील सर्वसाधारण कुटुंबात पूनम लहानाची मोठी झाली. वयाच्या १८ व्या वषार्पासून इंडस्ट्रीत नशीब आजमावणा-या पूनमला २०११ मध्ये कॅलेंडर गर्ल म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर तिने मॉडलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. असं सगळं काही ठीक असताना ती अचानकपणे अडल्ट फिल्मकडे कशी काय वळली हा प्रश्न सा-यांनाच पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वत: पूनमने दिलं होतं.‘मी इंडस्ट्रीमध्ये आले त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही जणांनी मला एक सल्ला दिला होता. जर हिट व्हायचं असेल तर काही तरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट कर. मी फक्त लोकांच्या याच गोष्टीवर विश्वास ठेवला आणि हळूहळू त्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली. एकीकडे यश, लोकप्रियता मिळत होती. पण,नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, कॉन्ट्रोवर्सीमुळे मिळालेली लोकप्रियता केवळ १५ मिनिटांचीच असते,’असं पूनम म्हणाली होती