पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या कंगना रणौतचा शो लॉक अपमध्ये (Lock Upp) कैदी म्हणून कैद आहे. वेगवेगळ्या कारणांनी ती चर्चेत असते. आता लवकरच फॅन्सना सरप्राइज देण्याचं प्लानिंग करत आहे. पूनम पांडेने फॅन्सचा प्रॉमीस केलं आहे की, ती लाईव्ह कॅमेरासमोर टॉपलेस होणार. पण यासाठी तिने एक अटही ठेवली आहे. जर ही अट पूर्ण झाली तरच ती सर्वांसमोर टॉपलेस होणार आहे.
भारतीय क्रिकेट टीम जिंकल्यानंतर टॉपलेस होण्याचं आश्वासन देणारी पूनम पांडेने पुन्हा एकदा फॅन्सना आश्वासन दिलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लॉक अपमध्ये मुनव्वर, अंजली, आजमा, अली मर्चेंट आणि विनित कक्कडसमोर फॅन्सना पूनमने हे आश्वासन दिलं.
काय आहे अट?
पूनम पांडेने तिच्या को-कन्टेस्टंट समोर प्रॉमीस केलं आणि म्हणाली की, 'हॅलो, जे कुणी ऐकत असतील. चार्जशीटपासून मला वाचवा. देवाची शप्पथ घेते की, तुम्हा लोकांना एक मस्त सरप्राइज देणार. कॅमेरासमोर देणार आणि पूनम पांडे स्टाइलमध्ये देणार. तुम्ही लोक मला व्होट देऊन वाचवा आणि मग बघा या जेलमध्ये काय होतं'.
स्पर्धकांनी घेतली मजा
पूनम पांडेने सांगितलेलं ऐकल्यावर सगळेच हैराण झाले. गमतीदारपणे आजमा आणि मुनव्वरने तिला प्रेक्षकांना हे सांगण्यास सांगितलं की, ती काय योजना बनवत आहे. तो गमतीने असंही म्हणाला की, तू त्यांना ट्रेलर दाखवला पाहिजे. विनीत कक्कड म्हणाला की, ती फक्त खोटं बोलत आहे आणि ती काही करणार नाही. पण पूनम म्हणाली की, ती तिचं आश्वासन पूर्ण करणार.
बराच फोर्स केल्यानंतर पूनमने हे मान्य केलं की, जर तिचे फॅन्स तिला नॉमिनेशनपासून वाचवतील तर ती टॉपलेस होणार. हे ऐकून तिथे उपस्थित सगळे लोक गप्प झाले आणि पूनम जोरजोरात हसू लागली होती. यानंतर रात्री विनीत पूनमला म्हणाला की, तू नोटीस केलं नसेल, पण आपण खूप आधीपासून मित्र आहोत. त्याने तिचे सगळे व्हिडीओ पाहिले आहेत. हे सगळं बोलत असताना पूनम लाजत होती.