कंगना राणौत (Kangana Ranaut)च्या रिअॅलिटी शो लॉकअप(Lock Upp)मध्ये स्पर्धक धुमाकूळ घालत आहेत. लॉकअपमध्ये स्पर्धक स्वतःबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहेत. या शोमध्ये अनेक स्पर्धकांचे भावनिक ब्रेकडाउन झाले आहे. आता स्पर्धक पूनम पांडे(Poonam Pandey)ला तिचे कठीण दिवस आठवले. जेव्हा तिचे कुटुंब आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले होते. स्वतःबद्दल बोलताना पूनम रडायला लागते. पूनमने सांगितले की, हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. पूनमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करणवीर बोहरासोबत बोलताना पूनम पांडे स्वतःबद्दल सांगत आहे. ती अश्रू पुसत म्हणते की मी ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते आहे. मी माझ्या कुटुंबासोबत राहायचे. माझे आई वडील आणि बहीण. आम्ही सगळे एकत्र राहत होतो. ते माझे कुटुंब होते म्हणून आम्हाला हाकलून दिले. आई आणि वडील काहीच बोलले नाहीत कारण त्यावेळी घरात मी एकटीच कमवत होते. मी कोणाबद्दल काही चुकीचे बोलली का? कामाच्या शोधात होते.
पूनम पांडेशी बोलताना करणवीर बोहरा म्हणाला- तू भाई है भाई. त्यानंतर तो पूनमला शांत व्हायला सांगतो. त्यानंतर पूनम म्हणते की, मी जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर पडली तेव्हा मला माझ्या घरी येण्यास नकार देण्यात आला. प्रत्येकजण म्हणत होता की मी चुकीची आणि वाईट आहे. लोकांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी मला जज केले. निदान माझ्याबद्दल मत बनवण्याआधी मला भेटा.
करण कुंद्रा घेतो स्पर्धकांची शाळाकंगना राणौतच्या लॉकअपमध्ये करण कुंद्रा देखील दिसत आहे. तो शोमध्ये जेलरच्या भूमिकेत दिसतो, जो स्पर्धकांना काम करायला लावतो आणि काही वेळा त्यांची शाळादेखील घेतो.