Lock Upp Winner : काहीशी ‘बिग बॉस’सारखी थीम असलेला पण ‘बिग बॉस’पेक्षा पूर्णत: वेगळा असलेला कंगना राणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (LockUpp) हा रिअॅलिटी शो तुफान गाजला. इतका की, लोकप्रियतेच्या बाबतीत ‘बिग बॉस’लाही त्यानं मागे सोडलं. या शोला 500 मिलियन व्ह्यूज मिळाले. काल या बहुचर्चित शोचा ग्रँड फिनाले पार पडला. ‘लॉक अप’ची ट्रॉफी कोण जिंकतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि मुनव्वर फारुकी हा शोचा विजेता ठरला. 70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉक अप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
काय मिळालं प्राईज?‘लॉक अप’ या शोचा विजेता ठरलेल्या मुनव्वर फारुकीला एक चकाकती ट्रॉफी आणि 20 लाख रूपयांचं कॅश प्राईज बक्षिस म्हणून देण्यात आलं. इतकंच नाही तर एक अलिशान कार भेट म्हणून देण्यात आली. त्यासोबतच त्याला परदेशात फिरायला जाण्याची संधीही मिळणार आहे. फॉरेन ट्रिपचं तिकिटं त्याला मिळालं. या शोचा विजेता ठरल्यानंतर मुनव्वरने आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले. गेल्या दोन रात्रीपासून मी अजिबात झोपलेलो नाही. मला ग्रँड फिनालेची फार जास्त भीती वाटत होती. मी फार घाबरलो होतो, असं तो यावेळी म्हणाला.
हे ठरले फायनलिस्ट ‘लॉक अप’ हा शो गेल्या 27 फेब्रुवारीला सुरु झाला. या शो मध्ये एकूण 20 स्पर्धक सहभागी झाले होते. यात शिवम शर्मा, पायल रोहतगी, आझम फलाह, मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा आणि प्रिन्स नरुला आदींचा समावेश होता. नावाचा समावेश होता. शेवटच्या टप्प्यात मुनव्वर, पायल रोहतगी, अंजली अरोरा, आजमा फलाह व शिवम शर्मा हे पाच फायनलिस्ट होते. यातून टॉप 3 फायनलिस्ट निवडले गेले. यात अंजली अरोरा, पायल रोहतगी, मुनव्वर फारूकी यांचा समावेश होता. सर्वाधिक मते मिळालेला मुनव्वर शोचा पहिला विजेता ठरला. तर पायल या शोची फर्स्ट रनरअप ठरली.