Join us

लॉकडाउनमध्ये कनिका कपूर मुलांच्या आठवणीने झालीय व्याकूळ, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:05 IST

कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कनिका कपूर खूप चर्चेत आली होती.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूर खूप चर्चेत आली होती जेव्हा तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आले होते. या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. कारण ती कोरोना पॉझिटिव्ह असतानाही काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. ज्यात काही राजकीय नेतेदेखील सहभागी झाले होते. लखनऊमध्ये कनिका कपूरने उपचार केले आणि आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.कनिका लखनऊमध्ये तिच्या आई वडिलांसोबत राहते आहे. परंतु लॉकडाउनमुळे ती तिच्या मुलांना भेटू शकत नाही. जे परदेशात आहेत. सोशल मीडियावर तिने मुलांचे फोटो शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंस्टाग्रामवर कनिका कपूरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तीन मुलं अयाना, समारा व युवराज दिसत आहेत. कनिकाने मुलांचे क्युट फोटो शेअर करत लिहिले की, तुमचे ज्या गोष्टीवर प्रेम असते आणि त्यावर तुम्ही प्रेम करत असता. तेव्हा तुमच्याकडे सगळे काही आहे जे तुम्हाला हवे आहे.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर कनिकाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच हॉस्पिटलचेदेखील एका पोस्टच्या माध्यमातून आभार मानले होते.

त्यानंतर तिने आणखीन एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ती प्लाझ्मा डोनेट करणार आहे. कनिका लखनऊतील पीजीआई हॉस्पिटलमध्ये 20 मार्चला दाखल झाली होती आणि 6 एप्रिलला तिला डिस्चार्च देण्यात आला होता.

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या