Join us  

Lockdown : 13 दिवसांपासून घरात कैद असलेल्या आनंदला कोसळले रडू... सोनम कपूरने असा दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 3:51 PM

अनिल कपूरचा जावई का झाला भावूक

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे ‘जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम दिसली होती.

सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम व आनंद दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत. हे कपल नुकतेच लंडनवरून परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या 13 दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये असलेल्या या कपलचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय. सोनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.यात आनंद अतिशय भावूक झालेला दिसतोय. अशास्थिती सोनम त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याच्या माथ्याचे चुंबन घेत त्याला धीर देताना दिसतेय. हा फोटो शेअर करताना सोनम बॉब मार्लेच्या ‘Three little birds’ या गीताच्या काही ओळी लिहिल्या आहेत.

आनंद व सोनम गत 19 मार्चला लंडनवरून भारतात परतले होते. तेव्हापासून दोघांनीही एका खोलीत स्वत:ला कैद करून घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरात कैद असल्याने आनंद काहीसा इमोशनल झालाय. पण सोनम मात्र त्याला धीर देतेय.

कोरोनाचा धोका असतानाही का परतले सोनम-आनंद?कोरोनाचा धोका असतानाही सोनम व आनंदने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. तसे ते परतलेही. अलीकडे अनुपमा चोप्रा हिला दिलेल्या मुलाखतीत सोनम यावर बोलली होती. इतकी मोठी जोखिम पत्करून तुम्ही भारतात येण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न सोनमला विचारला गेला होता. 

यावर उत्तर देताना सोनमने सांगितले होते की, भारतात लॉकडाऊनची घोषणा होण्याआधीच आम्ही परतण्याचा निर्णय घेतला होता. कारण माझे वडिल (अनिल कपूर) 63 वर्षांचे आहेत. माझी आई सुद्धा त्याच वयाची आहे. आम्ही सध्या आनंदच्या आजीकडे राहतोय. ती 80 च्या घरात आहेत. अशास्थितीत या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही परतलो. अगदी जोखीम असतानाही आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतलावर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे ‘जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम दिसली होती. यानंतर ती सुजॉय घोष यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘ब्लाइंड’ असल्याचे कळतेय.

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूर