लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला मोठ्या दिमाखात नुकतीच सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात डिजिटल माध्यमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात लोकमत डिजिटल मोस्ट व्हायरल स्टँडअप कॉमेडियनचा मानकरी मुनव्वर फारुकी( Munawar Faruqui ) ठरला. मुनव्वरने लोकमतचं आभार मानले. मला कॉमेडियन म्हणून अवॉर्ड दिलं यासाठी त्याने लोकमतचं विशेष आभार मानले. मुनव्वर फारुकीचे इन्स्टाग्रामवर 8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मुनावर फारुकी हा स्टँड अप कॉमेडियन तसेच रॅपरसुद्धा आहे. मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’(LockUpp)चा पहिला विजेता ठरला. 70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉकअप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ‘लॉकअप’ या शोचा विजेता ठरलेल्या मुनव्वर फारुकीला एक चकाकती ट्रॉफी आणि 20 लाख रूपयांचं कॅश प्राईज बक्षिस म्हणून देण्यात आलं. इतकंच नाही तर एक अलिशान कार भेट म्हणून देण्यात आली.
‘लॉक अप’ विजेता मुनव्वर फारुकीनं पटकावला लोकमत डिजिटल मोस्ट व्हायरल स्टँडअप कॉमेडियनचा अवॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 8:32 PM