Join us

रजनीकांत, कमल हसनसह या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, सकाळीच पोहोचले वोटिंग सेंटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 3:36 PM

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 

Lok sabha election 2024 : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची चर्चा आहे. सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली गेली आहे. १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणूकच्या २०२४  मधील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच काही सिनेस्टार देखील मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. लोकसभा निवडणकीच्या या पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये तामिळनाडू राज्याचा देखील समावेश आहे.

या दरम्यान सोशल मीडियावर तमिळनाडूमधून काही कलाकारांचा व्हिडिओ समोर आला आहे. अगदी सकाळीच अभिनेते अजीत कुमार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले. थिरुवान्मियूर येथाल मतदान केंद्रावर ते सकाळी ६:४५ वाजता पोहचल्याचं पाहायला मिळालं.

रजनीकांतनेही केलं मतदान-

अजीत कुमार यांच्या नंतर थलायवा रजनीकांत यांचादेखील व्हिडिओ समोर आला. चेन्नईतील मतदान केंद्रावर त्यांनी वोटिंग केलं. मीडियासोबत बोलताना रजनीकांत यांनी चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

चेन्नईतील कोयम्बेडु येथे अभिनेते कमल हसन सुद्धा मतदान करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं. 

अभिनेता धनुषनेही बजावला मतदानाचा हक्क- 

साउथ  स्टार धनुषने सकाळच्या सुमारास वोटिंग सेंटरवर हजेरी लावली. पापाराझींसमोर पोज देत धनुषने बोटांवरील शाई दाखवत मतदान केल्याचं सांगितलं.

टॅग्स :रजनीकांतधनुषकमल हासनलोकसभा निवडणूक २०२४