Join us

परेश रावल यांनी चौकीदार चोर है असे म्हणणाऱ्यांना लगावला असा टोला... वाचा त्यांचे भन्नाट ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 7:09 PM

परेश रावल यांनी केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण चौकीदार चोर है असे म्हणणाऱ्यांना त्यांनी या ट्वीटद्वारे अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

ठळक मुद्देपरेश रावल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चौकीदाराला चोर असे म्हणून कावळा मोर बनू पाहात होता... पण आता त्याची  अवस्था वटवाघुळासारखी झाली आहे, आता तर उलटे लटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशाबद्दल सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे चाहते विविध माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परेश रावल यांनी केलेले ट्वीट तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण चौकीदार चोर है असे म्हणणाऱ्यांना त्यांनी या ट्वीटद्वारे अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

परेश रावल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चौकीदाराला चोर असे म्हणून कावळा मोर बनू पाहात होता... पण आता त्याची  अवस्था वटवाघुळासारखी झाली आहे, आता तर उलटे लटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर त्यांच्या नावापुढे असणारा चौकीदार शब्द हटवला आहे. संध्याकाळी सहानंतर मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील चौकीदार शब्द हटवला. आता चौकीदार स्पिरीट नव्या पातळीवर न्यायची वेळ आली असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे. 

 

चौकीदाराचं स्पिरीट प्रत्येक क्षणी जिवंत ठेऊया आणि भारताच्या विकासासाठी काम करूया. माझ्या ट्विटर अकाऊटंवरुन चौकीदार शब्द हटवतोय. पण तो माझा अभिन्न हिस्सा राहील. तुम्ही सर्वांनीदेखील असंच करावं अशी विनंती करतो,' असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी दुसऱ्या एका ट्विटमधून देशातील जनतेचं कौतुक केलं आहे. 'जनता चौकीदार झाली आणि त्यांनी देशाची सेवा केली. जातीयवाद, भ्रष्टाचार, भांडवलवाद यांच्यासारख्या राक्षसांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी चौकीदार शब्द अतिशय सामर्थ्यशाली ठरला,' असं मोदींनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

त्याआधी मोदींनी शानदार विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. 'भारताचे धन्यवाद! आमच्या आघाडीवर जनतेनं व्यक्त केलेला विश्वास आम्हाला लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करण्याची शक्ती देतो,' अशा शब्दांत मोदींनी जनतेचे धन्यवाद मानले. या ट्विटमधून त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. 'भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सरकारचा विकासाचा अजेंडा तळागाळापर्यंत नेण्यासाठी ते लोकांच्या घरोघरी गेले,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :परेश रावलनरेंद्र मोदीलोकसभालोकसभा निवडणूक २०१९लोकसभा निवडणूक निकाल