Join us

LMOTY 2019: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 8:24 PM

दिमाखदार सोहळ्यात दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा सिनेसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमत कडून सत्कार करण्यात आला आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये बुधवारी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दीपिका ही बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची कन्या आहे. दीपिका यांनी २००६ मध्ये कन्नड सिनेसृष्टीतून एन्ट्री केली. तिचा पहिला चित्रपट ऐश्वर्या हा होता. यानंतर दिपिका यांनी अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ओम शांती ओम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर दीपिका यांनी बचना ए हसिनो, हाऊसफुलसारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये बस्तान बसविले. या चित्रपटांनंतर दीपिका यांच्या वाट्याला पद्मावत, बाजीराव मस्तानी सारख गाजलेल चित्रपट आले. या काळात त्यांना तीन फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. 

हे होतं परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.

टॅग्स :दीपिका पादुकोणमहाराष्ट्र