Join us

#LokmatWomenSummit2018 : इंडस्ट्रीतील 25 वर्षांच्या प्रवासात माझ्या वाट्याला चांगलेच अनुभव आलेत- राणी मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 3:55 PM

Lokmat Women Summit 2018: पुण्यात आज शुक्रवारी रंगलेल्या ‘लोकमत वुमन समिट2018’मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी हिने उपस्थितीत लावली. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राणी ‘लोकमत वुमन समिट2018’च्या मंचावर आली आणि तिला बघतात, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

पुण्यात आज शुक्रवारी रंगलेल्या ‘लोकमत विमेन समिट २०१८’ मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी हिने उपस्थितीत लावली. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राणी ‘लोकमत विमेन समिट २०१८’च्या मंचावर आली आणि तिला बघतात, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.  या स्वागतानंतर राणीने आपल्या चिरपरिचित दिलखुलास हास्याने ‘लोकमत वुमन समिट2018’मध्ये वेगळेच रंग भरले. ‘लोकमत वुमन समिट2018’च्या मंचावर राणीने अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिलीत. तथापि बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेल्या ‘मीटू’च्या ज्वलंत मुद्यावर तिने थेट बोलणे टाळले. इंडस्ट्रीतील 25 वर्षांच्या प्रवासात मला फार चांगले अनुभव मिळालेत. बॉलिवूडमध्ये खूप प्रतिभावान लोक आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, असे राणी म्हणाली. बॉलिवूडमध्ये अनेकजण ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याच्या इर्षेने येतात. मला वाटते कलेवर प्रेम असेल, अभिनयावर प्रेम असेल तरचं या इंडस्ट्रीत या, असा सल्ला या क्षेत्रात येऊ इच्छिणा-यांना मी देईल, असे ती म्हणाली.लग्नानंतर, आई झाल्यानंतर आयुष्याचा प्राधान्यक्रम बदलतो. आई झाल्यानंतर चित्रपट करणे कठीण असतं. आई झाल्यानंतर माझा पहिला चित्रपट होता ‘हिचकी’. मला आठवते, ‘हिचकी’च्या पहिल्या दिवसाच्या शूटला जात असताना मी कारमध्ये रडत होते. माझ्या मुलीच्या आठवणीने माझे डोळे पाणावले होते. मला काय होतयं, हे मलाही कळेनासे झाले होते.  आई झाल्यानंतर मी ‘हिचकी’ हा चित्रपट केला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला आणि मला मनापासून स्वीकारले, याचा आनंद आहे, असे राणी म्हणाली.चीनमध्ये ‘हिचकी’ला चीनमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा माझ्यासाठी सुंदर अनुभव आहे. ‘हिचकी’ पाहून प्रत्येक चीनी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू होते. इंग्रजी सबटायटल वाचून ते ढसाढसा रडत होते. चित्रपटांना भाषा नसते, हे त्यादिवशी मला समजले. याप्रसंगी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रश्नांनाही राणीने मनमोकळेपणानी उत्तरे दिलीत. तिन्ही खानांपैकी तुझा आवडता ‘खान’ कोणता, असा प्रश्न विजय दर्डा यांनी केला. यावर बॉलिवूडचे तिन्ही खान माझे आवडते आहेत. त्या तिघांचेही माझ्या आयुष्यात वेगळे स्थान आहे, असे राणी म्हणाली.

 

टॅग्स :लोकमत विमेन समिट २०१८राणी मुखर्जीमीटू