Join us  

जय हो...! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्याने केलं भाजपाचं अभिनंदन, शेअर केला PM मोदींचा 'तो' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:18 AM

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या यशानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. 

Loksabha Election Result 2024: जून महिन्यातील ४ तारखेचा मंगळवार संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा होता. लोकसभा निवडणुक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार की सत्तापालट होणार? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या या निकालात भाजपला २४० जागांवर तर NDA ला २९२ जागांवर यश मिळालं. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या यशानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. 

मराठी अभिनेताअभिजीत केळकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अभिजीत अनेकदा समाजातील घडामोडींवरही पोस्टद्वारे व्यक्त होत असतो. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोंदीचा फोटो शेअर करत अभिजीतने आनंद व्यक्त केला आहे. अभिजीतने मोदींचा हसरा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो शेअर करत त्याने "जय हो!" असं म्हटलं आहे. तर स्लमडॉग मिलेनियर सिनेमातील "जय हो!" हे गाणंही त्याने या पोस्टला दिलं आहे. 

दरम्यान, अभिजीत केळकरने देखील काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश करत त्याच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या प्रचार रॅलीतही तो दिसला होता. 

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ 

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत NDA ला जरी पूर्ण बहुमत मिळालं असलं तरी भाजपाचं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं आहे. २४० जागांवर विजय मिळवल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर इंडिया आघाडीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याच्या तयारीत आहे. इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालमराठी अभिनेताअभिजीत केळकरभाजपानरेंद्र मोदी