Join us  

सोनाक्षी सिन्हाला सर्च करताय.. सावधान !... हा आहे धोका

By admin | Published: October 16, 2016 1:30 PM

इंटरनेटवर सर्च करण्याच्या बाबतीत दबंग सोनाक्षी सिन्हाने देसी गर्ल प्रियांका चोप्रालाही मागे टाकलं आहे. २०१५ या वर्षात प्रियांका चोप्रा मोस्ट सेंसेशनल सेलिब्रिटी होती.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ - इंटरनेटवर सर्च करण्याच्या बाबतीत दबंग सोनाक्षी सिन्हाने देसी गर्ल प्रियांका चोप्रालाही मागे टाकलं आहे. २०१५ या वर्षात प्रियांका चोप्रा मोस्ट सेंसेशनल सेलिब्रिटी होती. २०१६ मध्ये ती जागा सोनाक्षी सिन्हाने घेतली आहे.  सोनाक्षीला ऑनलाइन सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.  मात्र, आता प्रियांका चोप्रा सातव्या क्रमांकावर पोहचली आहे. मोस्ट सेंसेशनल सेलिब्रिटी २०१६नुसार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्लस टोरेंट असे सर्च केल्यास चुकीच्या वेबसाईटवर जाण्याची शक्यता २१% आहे. तर सोनाक्षी सिन्हा सर्च केल्यास एकूण ११.११% घातक असल्याचं समोर आलं आहे.
 
इंटेल सिक्यूरीटीच्या कंपनीच्या मॅकअ‍ॅफे व्हायरस प्रोटेक्शननं केलेल्या सर्व्हेनुसार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपसाठी धोकादायक आहे. या सेलिब्रिटींबाबत तुम्ही सर्च केलंत तर कॉम्प्यूटरमध्ये व्हायरस जाण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं या सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. हॅकर्स जाणून-बुजून बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्याशी संबंधित बातम्यांचा वापर करतात जेणेकरुन सामान्य नागरिकांची माहिती आणि पासवर्ड चोरी करता येईल.
 
२०१६ या वर्षातील वर्षातील मोस्ट सेंसेशनल सेलिब्रिटी पैकी टॉप १० मध्ये ५० टक्के बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत. ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा, करिना कपूर, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, कृती सेनन, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे. तर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान, अक्षय कुमार यांचा यामध्ये समावेश नाही.
 
मॅकअ‍ॅफे व्हायरस प्रोटेक्शननं केलेल्या सर्व्हेनुसार यादी
सोनाक्षी सिन्हा - 11.11%
फरहान अख्तर - 9.56%
करीना कपूर - 8.67%
टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर - 8.44%
श्रद्धा कपूर - 8.11%
क्रिती सॅनोन - 7.67%
प्रियांका चोप्रा आणि शाहीद कपूर - 7.56%
बिपाशा बासू - 7.22%
सैफअली खान - 7.11%
आलिया भट - 7%