'अनेक अभिनेत्यांना माझ्यासोबत काम करायचे नसते', तापसी पन्नूने सांगितले बॉलिवूडमधील धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:03 PM2021-11-04T20:03:36+5:302021-11-04T20:03:59+5:30
तापसी पन्नूने तिला बॉलिवूडमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकतीच ती रश्मी रॉकेट या चित्रपटात झळकली आहे. तापसीने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. सूरमा, मुल्क आणि मनमर्जिया यासारख्या बऱ्याच चित्रपटात ती झळकली आहे. नुकतेच तापसी पन्नूने तिला बॉलिवूडमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मी आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तरीही अनेक बॉलिवूड अभिनेते आजही माझ्यासोबत काम करण्यास नकार देतात.
तापसी पन्नू म्हणाली की, बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार महिलांवर आधारित चित्रपटात काम करण्यास टाळाटाळ करतात. तसेच अनेक नवीन कलाकारांही माझ्यासोबत काम करत नाही. बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने माझ्यासोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यात मी दुहेरी भूमिका साकारणार होती. त्यावेळी त्याने एका तापसीला सांभाळणे अवघड आहे, यात तर दोन आहेत, असे सांगत नकार दिला होता.
दुर्दैवाने चित्रपटसृष्टीचे हेच आहे वास्तव
ती पुढे म्हणाली की, तसेच माझ्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करण्यासाठी एका अभिनेत्याला ऑफर देण्यात आली होती. यापूर्वीही आम्ही १-२ चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यावेळी त्याने मला हा चित्रपट करायचा नाही, असे सांगत थेट नकार दिला. या चित्रपटाच्या शेवटी सर्व सहानुभूती मुलीच्या पात्राला मिळते. ही एक प्रेमकथा होती. मी त्याला सांगितले होते की, एक अभिनेता म्हणून मला त्याच्यावर विश्वास आहे. त्याने यापूर्वीही असे अनेक चित्रपट केले आहेत. मला माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. दुर्दैवाने चित्रपटसृष्टीचे हेच वास्तव असून ज्याला आपण दररोज सामोरे जात आहोत. जेव्हा कधी मी माझ्या निर्मात्यांसोबत बसते, तेव्हा त्यांच्याकडे माझ्यासोबत काम करणाऱ्या टॉप पाच अभिनेत्यांची यादी तयार असते. हे सर्व अभिनेते यापूर्वी माझ्यासोबत स्क्रीनवर झळकलेले असतात. त्यांनाही माझ्यासोबत काम करायचे नसते. कारण आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेने आपल्याला शिकवले असते की, ज्या चित्रपटात तुमचे पात्र फक्त १० टक्के असेल, अशा चित्रपटात काम करु नका.