फिल्म स्टार्स म्हणजे ग्लॅमरचे झगमगते विश्व. त्यांचा उर्वरित समाजाशी फारसा संबंध येत नाही आणि म्हणूनच समाजातील चांगल्या-वार्ईट घटनांचे पडसाद त्यांच्या रोजच्या जीवनावर उमटत नाहीत, असा एक सर्वसामान्य समज आहे. हे काही अंशी खरे असले तरी पूर्णत: खरे नाही. ग्लॅमरच्या या झगमगत्या विश्वातही असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या जीवनातही समाजातील चांगल्या-वार्ईट घटनांचे पडसाद उमटत असतात आणि हे चित्र बदलावे म्हणून ते स्वत: पुढाकारही घेत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियानेही काल-परवाच महिला सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्याची गरज व्यक्त करीत या काही ठोस करण्याचे जाहीर केले आहे. या यादीत अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान ही बडी मंडळी तर आहेतच शिवाय असे अनेक कलाकार आहेत, जे प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. परंतु त्यांनी कधीच याची पर्वा न करता सामाजिक बांधिलकीतून विधायक कार्याची गुढी उंच उभारली आहे. पडद्यामागच्या या त्यांच्या या कार्यावर एक नजर...विद्या बालन जाहिरातीद्वारे ‘सोच बदलो’ म्हणणारी विद्या बालन पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेकडे अधिक ध्यान द्यावे म्हणून कार्यरत आहे. विद्या स्वच्छतेशिवाय जागतिक वन्यजीव निधीच्या अर्थ अवर कॅम्पेन आणि मुलांसाठीच्या गरजांसाठीच्या कामांमध्ये अग्रेसर आहे. ही हळव्या मनाची नायिका अनेकदा सामाजिक उपक्रमांमध्ये स्वयंप्रेरणेणे सहभागी होत असते. प्रीती झिंटामहिला भ्रूणहत्येसंदर्भात प्रीतीने अग्रेसर भूमिका घेतली होती. त्याशिवाय ती ‘द लुम्बा ट्रस्ट’ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ही संस्था विधवा आणि त्यांच्या मुलांसाठी कार्य करते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एच. आय. व्ही., एड्स संदर्भातील कार्यक्रमाशी ती जोडली गेली होती. या संदर्भात अधिक जागरुकता आणण्यासंदर्भात तिने काम केले आहे. पुढेही मी अशा विधायक कार्यात नेहमी सहभागी होत राहीन, असे प्रीती नेहमी सांगत असते. शबाना आझमीमुले आणि महिलांचा अधिकार आणि एड्स संदर्भात शबाना आझमी यांचे काम मोठे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मिजवान वेल्फेअर सोसायटीशी जुडल्याआहेत. विख्यात शायर कैफी आझमी यांनी या फांऊडेशनची सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी या संस्थेचे काम पुढे नेण्याचे ठरविले. या संस्थेच्यावतीने शाळा, महाविद्यालय, संगणक केंद्रे, शिवणकेंद्रे चालविण्यात येतात. याशिवाय विविध सामाजिक आंदोलनातही शबाना आझमी यांची उपस्थिती असते.गुल पनागगुल पनाग राजकीय क्षेत्राबरोबरच समशेरसिंग फाऊंडेशनसोबत काम करते. त्याशिवाय गुल फॉर चेंज या संस्थेबरोबरच इतर अनेक संस्थांशी जोडली गेली आहे. दररोजच्या जीवनातील संघर्षासाठी झगडणाऱ्यांसोबत गुल नेहमी उभी ठाकली आहे. नंदिता दाससामाजिक कार्यासोबतच समाजाच्या भल्यासाठी काम करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये नंदिता दासचे नाव पुढे आहे. ‘डार्क इज ब्युटीफुल’ यासाठी ती कॅम्पेनिंग करीत आहे. चेहऱ्यावर नसून कामावर लक्ष देणे आवश्यक असल्याचा संदेश ती या चळवळीद्वारे देत असते.मिलिंद सोमण‘पिंकथॉन’च्या पाठीमागे असणारा मिलिंद हा मॉडेल, अभिनेता आणि निर्माताही आहे. पिंकथॉन ही केवळ महिलांसाठीची १० किलोमीटरची मॅरेथॉन आहे. महिलांमध्ये तंदुरुस्ती आणि स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी त्याची ही सर्व धडपड सुरू असते.
बॉलीवूडने उभारली समाजसेवेची गुढी
By admin | Published: April 11, 2016 1:05 AM