Join us  

‘नटसम्राट’ची जोरदार चर्चा

By admin | Published: November 18, 2015 1:13 AM

बरेचदा असं म्हटलं जात की, चित्रपट हिट होण्यासाठी प्रचंड प्रमोशनची गरज असते. काही प्रमाणात ही गोष्ट खरीही आहे. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या शक्कल लढवून चित्रपटाचे

बरेचदा असं म्हटलं जात की, चित्रपट हिट होण्यासाठी प्रचंड प्रमोशनची गरज असते. काही प्रमाणात ही गोष्ट खरीही आहे. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या शक्कल लढवून चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. पण जोरदार प्रमोशन करूनही ते योग्य ट्रॅकवर नसेल तर व्हायचा तो परिणाम होतोच. त्यामुळे त्याचे करेक्ट प्रमोशन होणे जरुरीचे असते. आता हेच पाहा ना, महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला ‘नटसम्राट’ चित्रपट नाटकावर आधारित आहे हे आपल्याला माहितीच आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा तर वाढवल्या आहेतच, पण त्याच्या प्रमोशनच्या फंड्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोन महिने आधीच प्रचंड चर्चेत आहे. वि. वा. शिरवाडकर यांच्या अजरामर कलाकृ तीवर आधारित हा चित्रपट आहे. विश्वास जोशी व नाना पाटेकर या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. प्रदर्शनपूर्व दोन महिने हा चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे म्हटल्यावर हा चित्रपट यशस्वी करण्याची जबाबदारीही तितकीच वाढली असणार हे वेगळे सांगायला नको.