Join us

प्रेम, मैत्रीचा विश्वास ‘तू ही रे’

By admin | Published: August 26, 2015 5:10 AM

प्रेम, मैत्री या नात्यांच्या विश्वासाची नवी सुंदर ‘दुनियादारी’ संजय जाधव यांच्या ‘तू ही रे’मधून दिसणार असून सौंदर्याची नवी अनुभूती या चित्रपटातून मिळणार आहे. चॉकलेटबॉय

प्रेम, मैत्री या नात्यांच्या विश्वासाची नवी सुंदर ‘दुनियादारी’ संजय जाधव यांच्या ‘तू ही रे’मधून दिसणार असून सौंदर्याची नवी अनुभूती या चित्रपटातून मिळणार आहे. चॉकलेटबॉय स्वप्निल जोशी, गॉर्जीअस सई ताम्हणकर आणि ‘गुलाबाची कळी’ असलेली तेजस्विनी पंडितची ग्लॅमरस अदाकारी यामध्ये पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी,’ ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ या चित्रपटांनी मराठी चित्रपटांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्याच मालिकेत प्रेम, मैत्री अशा नात्यांवर विश्वास ठेवायला लावणारी कथा यामध्ये साकारणार आहे. कर्णमधुरच नव्हे; तर दृश्यमधुरही असलेल्या या चित्रपटाच्या रोमॅँटिक साँगनी आतापासूनच धूम उडविली आहे. या सगळ्या ग्लॅमरस कलाकारांच्या जोडीला सुशांत शेलार, गिरीश ओक, बालकलाकार मृणाल जाधव या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील काही वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सिनेमाची गाणी. ओठांवर रेंगाळणारी चटकन् आपलीशी होणारी गाणी गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीत दिले आहे. ‘सुंदरा,’ ‘गुलाबाची कली,’ ‘तोळा तोळा,’ ‘जीव हा सांग ना,’ अशी गाणी आहेत. ‘सुंदरा’ हे गाणं सई ताम्हणकरवर चित्रित झालं आहे. ‘गुलाबाची कली’ हे गाणं सध्या गाजत आहे. अमितराज आणि बेला शेंडे यांच्या आवाजातलं ‘तोळातोळा’ हे गाणंही सुरेख झालं आहे. ‘नको नको न रे’ या गाण्यात सायली पडघनच्या आवाजाची जादू आपल्याला ऐकायला मिळेल. ‘जीव हा सांग ना’ हे आदर्श शिंदे यांच्या आवाजातलं गाणंही अप्रतिम झालं आहे. ‘दृश्यम’मधील अनूचा गोड वावरस्वप्निल, सई, तेजस्विनी या सगळ्या ग्लॅमरस कलाकारांबरोबर ‘दृश्यम’ चित्रपटात अनूची भूमिका साकारलेल्या मृणाल जाधवचा गोड वावर हे ‘तू ही रे’चे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मृणाल जाधव हिने पदार्पणातच एकापेक्षा एक हिट सिनेमांतून काम करून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. तिची 'लय भारी' सिनेमामधील छोटी रुक्मिणी प्रेक्षकांना खूप भावली. गोड, निरागस आणि चुणचुणीत अशा मृणालने आतापर्यंत 'राधा ही बावरी', 'कोर्ट', 'नागरिक', 'टाइमपास २', 'दृश्यम' असे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे मृणाल तिच्या लाडक्या छोट्या चाहत्यांना 'तू ही रे'च्या निमित्ताने कोणत्या रूपात पाहायला मिळते याबाबत नक्कीच उत्सुकता आहे. दुनियादारी आणि प्यारवाली लव्हस्टोरी सिनेमाच्या यशानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांप्रमाणे ‘तू ही रे’ सिनेमाही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल, अशी खात्री मला वाटते आहे. या दोन्ही सिनेमांच्या टीमला ‘तू ही रे’मध्ये एका वेगळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. सिनेमाची गाणी प्रेक्षकांना आवडतील यात शंका नाही. - संजय जाधव, दिग्दर्शक