Join us

'लव्ह मी इंडिया' सिंगिंग रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 11:22 AM

पहिलावहिला लहान मुलांसाठीचा लाइव्ह सिंगिंग रिअॅलिटी शो, लव्ह मी इंडिया लवकरच सुरू होत आहे. ५-१५ या वयोगटातील मुलांमध्ये हा शो होणार आहे.

ठळक मुद्देगुरू रंधावा, अभिजात आणि नेहा भसीन परीतक्षकाच्या भूमिकेत मीयांग चांग या शोचे अँकरिंग करणार आहे

संगीत म्हणजे हृदयाची कथा असे अनेकदा म्हटले जाते, जिथे शब्द उणे पडतात, तिथे संगीत बोलू शकते. देशभरातील लक्षावधी प्रेक्षकांना भारतातील तरुण सिंगिंग सेन्सेशन निवडण्याचा अधिकार देणारा &TVचा पहिलावहिला लहान मुलांसाठीचा लाइव्ह सिंगिंग रिअॅलिटी शो, लव्ह मी इंडिया लवकरच सुरू होत आहे. ५-१५ या वयोगटातील मुलांमध्ये हा शो होणार आहे, ज्यात ४८ छोटे स्पर्धक त्यांच्या गानप्रतिभेच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयांवर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हा लव्ह मी इंडिया शो २२ सप्टेंबर २०१८ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या मतदानाच्या प्रक्रियेत भारतीय जनतेसोबत सहभागी होऊन त्यांना सिंगिंग मेगास्टार निवडण्यात मदत करणार आहेत संगीतक्षेत्रातील तीन उस्ताद. गुरू रंधावा, अभिजात आणि नेहा भसीन या शोद्वारे परीक्षणाच्या विश्वात पदार्पण करत आहेत. ७००हून अधिक गाजलेली गाणी आणि जगभरात सर्वांत मोठे लाइव्ह शोज खात्यावर जमा असलेले संगीतविश्वातील सर्वांत लोकप्रिय परीक्षक; अभिनेते, गायक व संगीतकार तसेच भारताचे सुपरहिट मशिन हिमेश रेशमियाही या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. चारही विभागांचा प्रत्येकी एक कॅप्टन असेल. तो या तरुण गायकांच्या मार्गदर्शकाची तसेच   मीयांग चांग या शोचे अँकरिंग करेल. त्याला साथ देईल अफलातून सुनंदा वाँग. 

भारतातील नव्या दमाच्या गायकांचा शोध घेण्यासाठी लव्ह मी इंडियाने एक अनोखी ऑडिशन प्रक्रिया सुरू केली. गायकांमधील सर्वोत्तम निवडण्यासाठी यातही देशाला मतदानाची संधी देण्यात आली आहे. ZEE5च्या पोर्टलवर आलेल्या ८० स्पर्धकांची प्रतिभा डिजिटल पद्धतीने तपासल्यानंतर प्रेक्षकांना भारतातील चारही विभागांत आयोजित करण्यात आलेल्या लाइव्ह कॉन्सर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या जादूई आवाजाची झलक देण्यात आली.  

टॅग्स :हिमेश रेशमिया