‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे कुमार गौरव (kumar gaurav). आपल्या स्मार्टनेस आणि गुड लुकिंगमुळे कुमार गौरव त्या काळचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जात होता. विशेष म्हणजे लव्ह स्टोरीसारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर हा अभिनेता बॉलिवूडमधून एकाएकी गायब झाला. त्यामुळेच आज हा अभिनेता नेमकं काय करतो? हे जाणून घेऊयात.
'लव्ह स्टोरी'नंतर कुमार गौरवने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याचे हे चित्रपट फारसे गाजले नाहीत. यामध्येच त्याची एक चूक त्याला महागात पडली असं म्हटलं जातं.
अभिनेत्रींसोबत काम करण्यास द्यायचा नकार
सूत्रांच्या माहितीनुसार, लव्ह स्टोरीच्या यशानंतर कुमार गौरव सहजासहजी कोणत्याही अभिनेत्रीसोबत काम करायला तयार होत नव्हता. आणि, त्याचं वारंवार नकार देणंच त्याच्या करिअरच्या अधोगतीसाठी कारणीभूत ठरलं. त्याच्याकडे येणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स हळूहळू कमी झाल्या.
संजय दत्तच्या बहिणीसोबत केलं लग्न
कुमार गौरव याची लव्ह लाइफ चांगलीच चर्चेत राहिली. रिमा कपूर, विजयता पंडित यांच्यासोबत कुमार गौरवचं अफेअर होतं असं म्हटलं जातं. मात्र, त्याने सुनील दत्त आणि नर्गिस यांची लेक नम्रता दत्त हिच्याशी लग्न केलं. संजय दत्तची बहीण असलेल्या नम्रताला कुमार गौरवने २ वर्ष डेट केलं आणि १९८४ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुलीदेखील आहेत.
अभिनय सोडून बिझनेसमॅन झाला कुमार गौरव
चित्रपटांचा ओघ कमी झाल्यानंतर कुमार गौरवने अभिनयक्षेत्राला रामराम करत व्यावसायाची वाट धरली. त्याने स्वत:चा बिझनेस सुरु केला. सध्या कुमार गौरव त्याचा बिझनेस सांभाळत आहेत.