Join us

अभिनेता आयुष शर्माने अशाप्रकारे केली सलमान खानची नक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 07:15 IST

आयुष स्टार प्लसवरील दांडिया नाईट्‌समध्ये आपली सहकलाकार वरिना हुसैनसोबत लव यात्रीचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. या कार्यक्रमात तो दांडिया खेळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याने आपला मेहुणा सलमान खानची नक्कल देखील केली आहे.

लव यात्री हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात आयुष शर्मा आणि वरिना हुसैन यांची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयुष हा सलमानची बहीण अर्पिताचा नवरा असून सलमाननेच लव यात्री या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन आयुष शर्मा, वरिना आणि सलमान खान करत आहेत.

आता आयुष स्टार प्लसवरील दांडिया नाईट्‌समध्ये आपली सहकलाकार वरिना हुसैनसोबत लव यात्रीचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. या कार्यक्रमात तो दांडिया खेळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याने आपला मेहुणा सलमान खानची नक्कल देखील केली आहे.

दांडिया नाईट्‌स कार्यक्रमात सूत्रधार आणि कॉमेडियन किकू शारदाने त्या दोघांना मंचावर त्यांच्या लव यात्री या आगामी चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी बोलावले. तेव्हा सर्वांना थक्क करत आयुषने सलमान खानची नक्कल केली. तो म्हणाला, “सलमान भाई मला खूप आवडतात. ते अतिशय चांगले आहेत. ते खूप विनोदी आहेत आणि अनेकदा खूप गोष्टी अगदी निरागसपणे बोलून जातात. जेव्हा मी खान परिवारात प्रवेश केला तेव्हा त्यांनी मला सल्ला दिला आणि ती त्यांनी मला सांगितलेली ती सर्वोत्तम गोष्ट होती. जेव्हा किकूने मला विचारले की, एक अभिनेता म्हणून माझी प्रेरणा कोण आहे, तर त्याचे उत्तर निश्चितपणे सलमान खान हे आहे आणि त्यांची नक्कल करण्यासाठी दांडिया नाईट्‌सपेक्षा चांगले व्यासपीठ कोणते असेल. माझा हा छोटासा परफॉर्मन्स मी त्यांनाच समर्पित करतो.”

आयुष शर्मा आणि वरिना हुसैन या दोघांनी मग त्यांच्या लव यात्री चित्रपटातील ‘चोगदा तारा’ या लोकप्रिय गीतावर परफॉर्मन्स सादर केला. छोट्‌या पडद्यावर प्रथमच प्रेक्षकांना आपला परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे या गोष्टीमुळे ते दोघेही अतिशय उत्साहात होते.

दांडिया नाईट्‌स १ ऑक्टोबर २०१८ पासून संध्याकाळी ७ वाजता स्टार प्लसवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :आयुष शर्मालवरात्रिसलमान खानवरिना हुसैन