Join us

लो प्रोफाइल हीरो... नको रे बाबा!

By admin | Published: February 22, 2016 3:14 AM

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘फितूर’ला बॉक्स आॅफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याचे कारण हाय प्रोफाइल हीरोईनच्या

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘फितूर’ला बॉक्स आॅफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याचे कारण हाय प्रोफाइल हीरोईनच्या समोर लो प्रोफाइल हीरो असल्याचे बोलले जाते. प्रेक्षक एखाद्या मोठ्या नायिकेला नवोदित नायकासोबत पसंत का करीत नाहीत? यावर चर्चा सुरू झाली आहे. तीनही खान स्टार- सलमान, आमीर आणि शाहरूखसोबत सुपर हिट चित्रपट देणाऱ्या कतरिनाबाबत ही चर्चा होती की, जर ‘फितूर’ला यश मिळाले असते, तर बॉलिवूडच्या नंबर १च्या जागेवर तिचा दावा पक्का झाला असता. मात्र तो फोल ठरला आहे. नवोदित नायक व स्टार नायिकांच्या जोडीवर ही एक नजर... प्रियंका चोप्राचा ‘मेरी कॉम’, दीपिका पदुकोनचा ‘पीकू’, विद्या बालनचा ‘कहानी’ आणि कंगनाचा ‘तनु वेड्स मनु’ सीरिजच्या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे असे मानले गेले की आता नायिकाप्रधान चित्रपटांचा काळ परत आला आहे. परंतु असे सगळ्याच नायिकांच्या बाबतीत घडले नाही. प्रियंकाने ‘असंभव’च्या अपयशामुळे मोठ्याच नायकांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा काही वर्षांपूर्वी आपला जवळचा मित्र हरमन बावेजासोबत ‘लव स्टोरी २०५०’ हा चित्रपट तिने केला. ज्याला प्रेक्षकांनी नापसंत केले आणि याला प्रियंकाचे अपयश मानले गेले. ऐश्वर्या रायने ‘दिल का रिश्ता’ चित्रपटात अर्जुन रामपालला हीरो बनविले; मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप गेला. दीपिका पदुकोनने यशराजमध्ये नील नितीन मुकेशसोबत ‘परिंदे लफंगे’ आणि अभिषेक बच्चनसोबत ‘खेलेंगे जी जान से’मध्ये फ्लॉप चित्रपटांचा अनुभव घेतला.

Feature - 
anuj.alankar@lokmat.com