Join us

लकी अली ३ वेळा चढला बोहल्यावर, तिसरी पत्नी तर २५ वर्षांनी होती लहान! तरी आली एकटं राहायची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 8:12 PM

आपल्या आवाजाने लोकांची मनं जिंकणाऱ्या लकी अलीने एक-दोन नव्हे तर तीन लग्नं केली आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.

लकी अली(Lucky Ali)चे खरं नाव मकसूद मोहम्मद अली आहे. लकीने गायलेली गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. 'एक पल का जीना', 'क्यों चलती है पवन' आणि 'ना तुम जानो ना हम' सारखी गाणी खूप लोकप्रिय आहेत. याशिवाय लकी अली लाइव्ह शो करून चाहत्यांना नाचायला लावतो. खूप चांगला गायक लकी अलीने अनेक हिट गाणी दिली आणि लोकांना त्याची गाणी खूप आवडली, पण आपल्या आवाजाने लोकांची मनं जिंकणाऱ्या लकी अलीने एक-दोन नव्हे तर तीन लग्नं केली आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. 

लकी अली पहिल्यांदा अभिनेत्री मेघन जेन मॅकक्लेरीच्या प्रेमात पडला. मेघनने लकी अलीच्या पहिल्या अल्बम 'सुनो'मध्ये काम केले होते. काम करत असतानाच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि दोघे  प्रेमात पडले. १९९६ मध्ये लकीने मेघनासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलेही आहेत पण काही काळानंतर दोघेही काही कारणाने वेगळे झाले. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी लकी अली अनाहिता या पर्शियन महिलेला भेटला. अनाहिताला पाहून लकी प्रेमात पडला.

अनाहिताने लकीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून इनाया ठेवले. इनाया आणि लकी यांना दोन मुले आहे. लकीचे दुसरे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. यानंतर लकी अली पुन्हा प्रेमात पडला आणि आश्चर्य वाटेल की यावेळी ब्रिटिश मॉडेल केट एलिझाबेथ त्याच्या आयुष्यात आली. जेव्हा केटने लकीशी लग्न केले तेव्हा ती त्या वेळी त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान होती. केटने लकीशी लग्न केल्यानंतर तिचे नाव बदलून आयशा अली असे ठेवले, पण हे लग्नही लवकरच तुटले. 2017 मध्ये दोघे वेगळे झाले. लकी आणि केटला एक मुलगा आहे.

लकी अलीने  गायक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात 'दुश्मन दुनिया का' या चित्रपटाच्या गाण्याने केली.हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. 'ना तुम जानो ना हम', 'आ भी जा', 'हैरात' आणि 'सफरनामा' अशी उत्कृष्ट गाणी गायली आहेत. मात्र वयाच्या ६४ वर्षीही लकी अली एकटाच राहतो. लकी लाइव्ह शो करत राहतो.

टॅग्स :लकी अली