Join us

Lust Stories 2 Teaser : 'लस्ट स्टोरीज 2' चा टीझर पाहिलात? विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 15:21 IST

नवी कहाणी, नव्या स्टारकास्टला घेऊन येत आहे लस्ट स्टोरीज 2.

नवी कहाणी, नव्या स्टारकास्टला घेऊन येत आहे लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2). होय चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कारण लस्ट स्टोरीज 2 चा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. यातली स्टारकास्टही दमदारही आहे. काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, अमृता सुभाषसह मोठी स्टारकास्ट आहे. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

लस्ट स्टोरीज पार्ट 2  अमित शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर बाल्की, सुजॉय घोष या चार  दिग्दर्शकांची कहाणी आहे. पहिल्या पार्टप्रमाणेच दुसऱ्या पार्टमध्येही चारही कहाण्या बोल्ड असल्याचं टीझरमधून दिसत आहे. पहिल्या पार्टमध्ये बोल्ड विषयांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. आता दुसऱ्या पार्टमध्येही असेच बोल्ड विषय घेण्यात आले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एका सीनमध्ये नीना गुप्ता म्हणतात गाडी खरेदी करण्याआधी टेस्ट ड्राईव्ह घेतली जाते, मग लग्न करण्यापूर्वी 'टेस्ट ड्राईव्ह' का नाही? यावरुनच तुम्ही अंदाजा लावू शकता हा सिनेमा कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष वेधतो.

 

सिनेमाबाबत आणखी एक लक्षात येणारी गोष्ट ती म्हणजे विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची केमिस्ट्री. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत असतानाच त्यांचा एक रोमँटिक सीन टीझरमध्ये दिसून येतोय. तर दुसरीकडे मृणाल ठाकूर आणि अंगद बेदीची जोडी पाहायला मिळत आहे.

टॅग्स :लस्ट स्टोरीजबॉलिवूडतमन्ना भाटियामृणाल ठाकूर