आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या अभिनयाने ८०च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देणारे आणि आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. कुणी त्यांना बॉलीवूडचे हिमॅन म्हणतं तर कुणी वीरू… रसिकांनी धरमपाजींवर कायमच प्रेम केलं आहे. आजही धर्मेंद्र यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत.
धर्मेंद्र सोशल मीडियावर आपल्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत असतात. जगभरात धर्मेंद्र यांचे प्रत्येक डायहार्ट फॅनला त्यांच्या मुंबईतील घराचा पत्ता माहिती असेल. मात्र त्याचं आणखी एक घर आहे. हे घर म्हणजे त्याचं आलिशान फार्महाऊस. या फार्म हाऊसविषयी रसिकांना फार काही माहित नाही. अनेकांनी हे पाहिलंसुद्धा नाही. याच फार्महाऊसची आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत.
आज अनेक कलाकार थोडे फार यश मिळाले की, लगेच हुरुळून जातात. मात्र इतकी लोकप्रियता, पैसा, प्रतिष्ठा मिळवूनही धर्मेंद्र यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. धर्मेंद्र कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. धर्मेंद्र सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात.धर्मेंद्र यांचे मुंबईपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात १०० एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे.
शहराच्या गर्दीपासून दूर जेव्हा निवांत श्वास घ्यायचा असतो त्यावेळी धर्मेंद्र फार्महाऊसवरच जातात. काही वर्षांपासून धर्मेंद्र येथे सेंद्रीय शेती करत आहे. याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला ते प्रोत्साहन देत असतात.शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत.
फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे.घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. शिवाय या वयातही धर्मेंद्र आपल्या फिटनेसबाब काटेकोर आहेत. त्यामुळे कुठेही असले तरी ते आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ देत नाही.