इरफान खान याचा उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण, परफॉर्मन्स यांच्यामुळे बरेच चित्रपट त्याला मिळत आहेत. आता त्याचा आगामी चित्रपट ‘मदारी’चे फर्स्ट पोस्टर आऊट करण्यात आले आहे. तो एकदम साध्या वेषात म्हणजेच ग्रे रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाचा डेनिम्स तसेच शूज त्याच्या हातात दिसत आहेत. डोक्याला त्याने कपडा बांधल्याचे कळते आहे. हा चित्रपट राजकीय वातावरणावर टीका करणारा आहे. या पोस्टरवर एक टॅगलाइन लिहिली आहे की, ‘देश सो रहा हैं’ (द कंट्री इज स्लीपिंग). मदारी चित्रपट हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारसरणीवर आधारित आहे, अशा अफवा आहेत. निर्माते याविषयी काहीही बोलायला तयार नाहीत.
‘मदारी’
By admin | Published: May 12, 2016 1:45 AM