Arjun Mathur : जोया अख्तर यांच्या 'मेड इन हेवन' या लोकप्रिय वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेता अर्जुन माथुर प्रसिद्धीझोतात आला. सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने वयाच्या ४२ व्या वर्षी गुपचूप लग्न उरकलं आहे. याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
अर्जुन माथुर दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर-
अॅमेझॉन प्राईमवरील 'मेड इन हेवन' या लोकप्रिय वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेता अर्जुन माथुर नावारुपाला आला. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्याचे काही फोटो समोर आले आहेत. वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. अभिनेत्याने प्रोडक्शन डिझायनर टिया तेजपालसोबत लग्नगाठ बांधल्याचं समजत आहे. खरंतर, अर्जुनने याबाबत अधिकृतरित्या कोणीतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अभिनेता नवरदेवाच्या वेशभूषेत पाहायला मिळतोय. यावेळी अर्जुन माथुरने लाल रंगाचा कुर्ता घातलाय तर नववधू टियाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार १० ऑक्टोबरच्या दिवशी अभिनेता विवाह बंधनात अडकल्याचं सांगण्यात येतंय. सोशल मीडियावर अर्जुनच्या लग्नाची खबर वाऱ्यासारखी पसरत आहे. शिवाय चाहत्यांनी या नव्या जोडप्याला कमेंटच्या माध्यमातून शुभ आशिर्वाद देत आहेत.
२०१० मध्ये केलं होतं पहिलं लग्न : अभिनेता अर्जुन माथुरने २०१० मध्ये सिमरित मल्हीसोबत लग्नगाठ बांधली होती. पण, वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या दोन वर्षानंतर ते विभक्त झाले. त्यानंतर अर्जुनने टियाला डेट करायला सुरुवात केली. टिया आणि अर्जुन अनेक वर्षांपासून एकत्र आहेत शिवा त्यांनी माध्यमांसमोर त्याचं नातं खाजगी ठेवलं.