काही महिन्यांपूर्वी मधुर भंडारकर तैमूर अली खानववर सिनेमा तयार करणार असल्याची चर्चा होती. मात्र मधुरा भंडारकर या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यांनी सांगितले ते तैमूरवर सिनेमा तयार करत नाहीत. सैफ अली खान आणि करिना कपूरचा छोटा नवाब तैमूर स्टारकिड्सच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे. तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. मधुर यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी तैमूरचे नाव रजिस्टर केल्याची चर्चा होती.
त्यामुळे येत्या दिवसांत आपल्या करिना व सैफच्या लाडक्या मुलाच्या नावाचा चित्रपट पाहायला मिळणार अशी आशा सगळ्यांना होती. नुकताच एका इव्हेंट दरम्यान मधुर यांनी खुलासा केला की, माझ्या प्रोडेक्शन हाऊस अंतर्गत अनेक नावांचे टायटल रजिस्टर करण्यात येत आहेत.