बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची लोकप्रियता आणि तरुणाईमध्ये असलेली तिची क्रेझ याविषयी काही वेगळं सांगायला नको. जवळपास ४ दशकांपासून माधुरी सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. या करकिर्दीत तिने ७० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. माधुरीने नायिकेसह खलनायिकेचीही भूमिका साकारली आहे. त्यामुळ तिने जवळपास सगळ्याच प्रकारची भूमिका साकारली आहे. परंतु, तिने तिच्या कारकिर्दीत असता सीन केला होता ज्याचा तिला आजही पश्चाताप होतो. एका मुलाखतीत तिने याविषयी खुलासा केला.१९९३ मध्ये माधुरीने 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने दयावान सिनेमात दिलेल्या किसिंग सीनविषयी खंत व्यक्त केली. हा सीन केला नसता तर बरं झालं असतं असं तिने यावेळी म्हटलं होतं.
१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दयावान' या सिनेमात माधुरीने मुख्य भूमिका केली होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता विनोद खन्ना याने स्क्रीन शेअर केली होती. यात विनोद आणि माधुरी यांच्यावर एक किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता. ज्यानंतर बराच गदारोळ माजला होता. इतकंच नाही तर हा सीन केल्याचा पश्चाताप झाल्याचंही माधुरीने कबूल केलं.
"मागे वळून पाहताना मला असं वाटतं की मी हा सीन करायला नको होता. पण, कदाचित मी त्यावेळी थोडी घाबरले होते. मला वाटायचं की, मी एक अभिनेत्री आहे आणि त्यासाठीच दिग्दर्शकांनी माझ्यासाठी खास पद्धतीने हा सीन आखला आहे. त्यामुळे जर मी हा सीन केला नाही तर त्याचा परिणाम कथेवर होईल असं मला वाटत होतं", असं माधुरी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी फिल्मी घराण्यातील नव्हते. माझ्या मागे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे मला इंडस्ट्रीविषयी किंवा तिथल्या कामाविषयी फारशी माहिती नव्हती. त्यावेळी आपण किसिंग सीनला नकार देऊ शकतो हेदेखील मला माहित नव्हतं. तसं पाहायला गेलं तर त्या सीनचा सिनेमाला फारसा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी ठरवलं की पुढे कधीच मी किसिंग सीन देणार नाही."
दरम्यान, माधुरीने १९८४ मध्ये अबोध सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात तिचे काही सिनेमा फ्लॉप गेले. परंतु, त्यानंतर आलेल्या तेजाब या सिनेमामुळे तिचं नशीब पालटलं. या सिनेमानंतर तिने 'दिल', 'खलनायक', 'साजन', 'बेटा', 'हम आपके है कौन' आणि 'दिल तो पागल है' यासारखे सुपरहिट सिनेमे दिले.