Join us  

माधुरी दीक्षितने एम.एफ. हुसेन यांच्यासोबतचा डेन्वरमधील किस्सा केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 8:40 PM

भारतातील लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा या आठवड्यातील भागात बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षित आणि सहकलाकार अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती.

भारतातील लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा या आठवड्यातील भागात बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षित आणि सहकलाकार अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. टोटल धमाल चित्रपटाचे कलाकार द कपिल शर्मा शोमध्ये येऊन हास्याची पातळी आणखी उंचावणार आहेत. जर महान अशा एम. एफ. हुसेनबद्दल बोलणे झाले नाही तर माधुरीबरोबरचे संभाषण अपूर्ण राहिले असे वाटते. कपिलबरोबर बोलताना माधुरीने एम एफ हुसेन ह्यांचा दिलदारपणा सांगितला आणि तो माणूस सर्व भौतिक गोष्टींपासून कशाप्रकारे लांब राहतो हेही सांगितले. जेव्हा ती डेन्वरमध्ये होती तेव्हाचा एक किस्सा तिने शेअर केला. 

"मी डेन्वरमध्ये होते आणि आर्यनचा नुकताच जन्म झाला होता. एक दिवस हुसेन साहेबांनी मला कॉल केला आणि त्यांनी माझे आईच्या रूपात पेंटिंग बनवण्याची इच्छा प्रदर्शित केली. कारण त्यांनी मला नायिका म्हणून अभिनय करताना बघितले होते आणि आता त्यांना मला एक आई म्हणून बघायचे होते म्हणजे मी घराची आणि मुलाची कशाप्रकारे काळजी घेते. त्यांना चित्रित करायचे होते. ते डेन्वरला फक्त एक रोल-अवे बॅग घेऊन आले होते ते बघून मी त्यांना विचारले तुमचे सामान कुठून आणायचे आहे का. तेव्हा ते म्हणाले माझ्याकडे फक्त ही एकच बॅग आहे बाकी कोणतेही सामान नाही. त्यांनी अजिबात वेळ न घालवता बाहेर जाऊन पेंटिंगसाठी कॅनव्हास शोधायला सुरुवात केली. मी त्यांना म्हटले की थोडी विश्रांती घ्या. त्यावर हुसेनसाहेब म्हणाले, 'विश्रांती घ्यायला सांगून तुम्ही मला शिक्षा देताय. जेव्हा मी पेटिंग बनवत असतो तेव्हा मी विश्रांतीच घेत असतो.' मी नाद सोडला आणि म्हटले की आपल्याला कॅनव्हास आणि पेंट्स लागतील तेव्हा आपल्या बॅगकडे बोट दाखवून ते म्हणले सर्व पेंट्स आहेत. मला आश्चर्य वाटले की त्यांच्या त्या एकाच बागेत सगळे पेंट्स आहेत आणि मी त्यांना कपड्यांबद्दल विचारलं. ते म्हणाले, 'हा शर्ट आणि पायजमा घातला आहे.' ते एक संत होते ज्यांना भौतिक गोष्टींमध्ये काहीही स्वारस्य नव्हते. ते फक्त आपल्या कलेशी इमान राखून होते." ती म्हणाली कला कशी जिवंत ठेवावी आणि स्टारडमपासून कसे लांब रहावे हे त्यांच्याकडून आणि पंडित बिरजू महाराजजी ह्यांच्याकडून शिकणे आवश्यक आहे. माधुरी दीक्षित व अनिल कपूरची मैत्री आणि काही रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी द कपिल शर्मा शो बघा रात्री ९:३० वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर आवर्जुन पहा.  

टॅग्स :अनिल कपूरमाधुरी दिक्षित