Join us

Madhuri Dixit : "मी अनिल कपूरसोबत लग्न करणार नाही"; 34 वर्षांपूर्वी माधुरीने का म्हटलं होतं 'असं'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 5:45 PM

Madhuri Dixit And Anil Kapoor : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी 90 च्या दशकात एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी 90 च्या दशकात एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीवर प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम केलं. अनिल कपूर यांच्यासोबतची माधुरीची सिझलिंग केमिस्ट्री पाहता, 1989 मध्ये एकदा एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं होतं की, ती खऱ्या आयुष्यात अनिल कपूरसोबत लग्न करणार का? HTच्या रिपोर्टनुसार, माधुरीने ही मुलाखत एका मॅगझिनला दिली होती, ज्यामध्ये तिने अनिल कपूर यांच्यासोबत लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता

माधुरी दीक्षित म्हणाली की, तिने अनिल कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत आणि तिला स्वतः ला त्यांच्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटतं, पण तरीही तिला त्यांच्याशी लग्न करायचं नाही. लग्न न करण्याचं कारण सांगताना अभिनेत्रीने "नाही, मी त्याच्यासारख्या व्यक्तीशी लग्न करणार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे तो अतिसंवेदनशील आहे आणि मला कूल नवरा हवा आहे" असं म्हटलं होतं. 

अनिल कपूर यांनी 1984 मध्ये सुनीता कपूरशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुली, रिया आणि सोनम कपूर आणि एक मुलगा हर्षवर्धन कपूर आहे. तर माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर ती अमेरिकेला गेली. त्यांना आरिन आणि रियान ही दोन मुलं आहेत. जवळपास एक दशक तिथे राहिल्यानंतर 2011 मध्ये ती मुंबईत परतली.

माधुरीने 2007 मध्ये 'आजा नचले' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले, त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची 2022 मध्ये आलेल्या 'मजा मा' चित्रपटात दिसली आहे. अनिल कपूरहे आताही एकदम फिट असून लवकरच 'द नाईट मॅनेजर 2' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :माधुरी दिक्षितअनिल कपूर