रणवीर अलाहाबादियाने (ranveer allahabadia) 'इंडियाज गॉट लेटन्ट' (indias got latent) या शोमध्ये आई-वडिलांसंबंधी एक अश्लील टिप्पणी केली. त्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला. अनेक स्तरांवरुन रणवीरवर टीका झाली. इतकंच नव्हे तर रणवीर आणि 'इंडियाज गॉट लेटन्ट'चा सर्वेसर्वा समय रैनावर (samay raina) पोलिसांना FIR दाखल केला. अशातच टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने रणवीरला खुलेआम धमकी दिली आहे. 'महाभारत' (mahabharat) मालिकेतील भीमाची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेला अभिनेता सौरव गुर्जरने (saurav gurjar) ही धमकी दिली आहे.
सौरवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "रणवीर शोमध्ये जे काही बोलला त्यासाठी त्याला माफ केलं जाऊ शकत नाही. जर त्याच्या वर्तवणुकीविरोधात आताच कारवाई केली गेली नाही तर त्याच्यासारख्याच गोष्टी बाकीचे लोकही करतील. त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जर आपल्याला पुढची पिढी, भोवतालचं वातावरण आणि सिस्टिमला वाचवायचं असेल तर कारवाई करणं गरजेचं आहे. जेणेकरुन पुढे कोणीही असा विचार करणार नाही."
"फ्रीडम ऑफ स्पीचचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणतीही बडबड कराल. मला एवढा राग येतोय ना की, मुंबईतील कोणत्याही पार्टी, शोमध्ये किंवा बाहेर कुठेही रणवीर मला भेटला तर त्याची सिक्युरीटी किंवा जगातली कोणतीही ताकद त्याला माझ्यापासून वाचवू शकणार नाही." असं म्हणत सौरवने महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला रणवीरला लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून मागणी केली आहे. सोरवबद्दल सांगायचं झालं तर तो अभिनेता आहे. 'महाभारत' मालिकेत सौरवने साकारलेली भीमाची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय सौरव हा WWE च्या रिंंगणातही लोकप्रिय आहे.