Join us

Puneet Issar : 'महाभारत' फेम अभिनेते पुनीत इस्सर यांची फसवणूक; ईमेल हॅक करून 13 लाख हडपण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:11 AM

Puneet Issar : पुनीत इस्सर यांचे ईमेल अकाउंट हॅक करून एका व्यक्तीने लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

कलाकारांसोबत फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. 'महाभारत' फेम अभिनेते पुनीत इस्सर (Puneet Issar) यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. पुनीत इस्सर यांचे ईमेल अकाउंट हॅक करून एका व्यक्तीने लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने अभिनेत्याचे ईमेल अकाउंट हॅक करून तब्बल 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये पुनीत इस्सर यांचा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु आरोपीने अभिनेत्याचा ईमेल हॅक केला. यानंतर शोच्या बुकिंगचे 13.76 लाख रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. पुनीत त्यांचा ईमेल एक्सेस करण्याचा प्रयत्न करत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मेल आयडीवरून केलेलं बुकिंग

पुनीत इस्सर यांनी त्यांच्या जय श्री राम या हिंदी नाटकासाठी एनसीपीए थिएटर बुक केले होते. यासाठी त्यांना 13,76,400 रुपये देण्यात आले. पुनीत हे नाटक 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी सादर करणार होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या थिएटर प्रोडक्शन कंपनीच्या मेल आयडीवरून बुकिंग केले होते. 22 नोव्हेंबर रोजी पुनीत इस्सर यांनी एनसीपीएला मेल करण्यासाठी त्यांचा मेल आयडी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेल आयडी उघडला नाही. यानंतर अभिनेते पुनीत यांनी पोलिसांत धाव घेतली.

आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुनीत इस्सर हे महाभारतातील दुर्योधनाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते बिग बॉसमध्येही पाहायला मिळाले. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पुनीत इस्सारगुन्हेगारी