महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असून जनतेचा कल महायुतीच्या बाजूने दिसत आहे. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्याबरोबरच भाजपा हा राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विधानसभेतून निवडूण आले आहेत. त्यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेताअभिजीत केळकरनेदेवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. "असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होत नाही. पौर्णिमेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही", असं अभिजीतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर या पोस्टला त्याने "धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...देवेंद्रजी फडणवीस आपले मनापासून त्रिवार अभिनंदन", असं कॅप्शन दिलं आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जवळपास २० हजारांचं मताधिक्य राखत ते निवडूण आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या प्रफुल्ल गुदधे यांचा पराभव करत देवेंद्र फडणवीस ६२ हजार ९४७ मतं मिळवत विजयी झाले आहेत.