नव्या वर्षात अगदी खास असा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शौर्य, धैर्या, प्रेम, मान, अपमानाची कथा असलेला "संगीत मानापमान" हा सिनेमा 10 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. 'संगीत मानापमान' या चित्रपटाचा नुकतंच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी बायकोचं नाव घेत, उपस्थितांनी एक खास विनंती केली.
सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लाँचला सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. पण, या कार्यक्रमाला ते एकटेच आले होते. कार्यक्रमाचं आमंत्रण असूनही मीसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस आल्या नव्हत्या.
अमृता फडणवीस या गायिका आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. "संगीत मानापमान" हा सुद्धा संगीतावर आधारीत सिनेमा असल्यानं देवेंद्र फडणवीस यांना सपत्नीक येण्याची विनंती केली होती. पण, ट्रेलर लाँन्च सोहळ्यात त्या न येण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अमृता यांना आमंत्रण सांगायला विसरले आणि एकटेच कार्यक्रमाला आले.
याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "'संगीत मानापमान' सिनेमा सर्व रेकॉर्ड तोडेल आणि प्रेक्षकांना भावेल. मी हा सिनेमा पाहिलं. फक्त तो कधी पाहायचा आणि कुणासोबत-कुणासोबत पाहायचा, याचं नियोजन करावं लागेल. माझी पत्नी अमृताला घेऊन येईन. खरं तरं तिला आज यायला आवडलं असत. या कार्यक्रमाला तिला आमंत्रण होतं. पण, हे मी तिला सांगायचं विसरलो. तर तिला हे कळू देऊ नका" असं ते गंमतीत म्हणाले.