बारामती : “धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच याबाबतचा आवश्यक विधीमंडळाचा ठराव महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केंद्राकडे पाठविण्याची जबाबदारी स्वीकारतो,” अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. बारामती येथील शारदा प्रांगणात अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री मुंडे यांनी केंद्राकडे आम्ही ठराव पाठवणार, एकदा कळू द्या की कोणाच्या मनात आरक्षण द्यायचे नाही, असा टोला देखील लगावला. “अडीचशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य कोणत्याही एका जाती-धमार्पुरते मर्यादित नव्हते. तेच कार्य छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. सर्व जातीधर्मातील लोकांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्या,” असे आवाहन मुंडे यांनी केले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरक्षणाचा प्रस्ताव तर राज्य शासन सादर करेल. तसेच आदिवासी समाजाप्रमाणे जास्तीत जास्त निधी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. देशात-राज्यात कोणताही प्रश्नावर शरद पवार हे एकच औषध आहे. समाजबांधवांनी पवार कुटुंबियांनी दिलेले योगदान लक्षात घ्यावे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकत्याला मंत्रीपदाची संधी त्यांच्यामुळेच मिळाली.” समाजाचे नाव घेऊन, समाजाला वाऱ्यावर सोडणारे काही लोक राजकीय पोळी भाजण्याचे काम करीत आहेत. त्सोलापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४.५० कोटी रुपये मंजूर केल्याचे भरणे यांनी सांगितले.
“अहिल्यादेवी होळकर यांनी तीनशे वर्षांपूर्वी समतेचा संदेश दिला. वटपोर्णिमेदिवशी केलेल्या पोस्टवरून काहींनी माज्यावर धर्म बुडवल्याची टीका केली. संबंधितांनी स्वत:च्या घरात ते महिलेला किती सन्मान देतात हे पहावे. वडाला एक फेरा न मारल्याने धर्म बुडतो कसा, सामुहिक बलात्कार, रस्त्यावर होणारे महिलांचे विनयभंग, हुंडाबळीने धर्म बुडत नाही का?,” असा सवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला.
...आमच्या दोघांच्या अनुपस्थितीची ब्रेकिंगखराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमासाठी पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या निरोपामुळेच ऐनवेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मात्र,माझ्यासह दत्तात्रय भरणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मुंबईत विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआची महत्त्वाची बैठक पार पडताना आमच्या दोघांच्या अनुपस्थितीची ब्रेकिंग होईल, अशी मिश्कील टीपण्णी त्धनंजय मुंडे यांनी केली.
... तर महाराष्ट्राला माझा परिचयच झाला नसतामला घरातून हाकलून दिल्यानंतर मला बारामतीने संधी दिली. त्यावेळी संधी दिली नसती तर धनंजय मुंडे कोण हे महाराष्ट्राला परिचित झाले नसते, कोणाचं रक्ताच, कोणाच जाती-पातीचे, कोणाचं मातीचं नात असतं पण आमचं बारामतीशी विश्वासाचे नाते असल्याचे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.