लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, त्याचा परिणाम दक्षिण भारतावरदेखील होत आहे. उत्तरेकडील गार वारे दक्षिणेकडे वाहत असून, यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे किमान तापमान खाली घसरले आहे. अनेक शहरांचे किमान तापमान एक आकडे नोंदविण्यात आले असून, महाबळेश्वर आणि नाशिकसारख्या शहरांचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरले आहे.
पुढील पाच दिवसांत उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईचे किमान तापमान १४ अंशावर घसरले आहे. खरोखरच कमाल आहे
सोमवारी महाबळेश्वर २०.५, मुंबई २४.८, अलिबाग २४, डहाणू २२.४, रत्नागिरी २६, पुणे २५.४, नाशिक २३.९, शिर्डी २१, कोल्हापूर २६.६, सातारा २५.८, परभणी २४.१, जालना २४.२, नांदेड २६.२, उस्मानाबाद २४.१ इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी हेच आकडे किमान तापमान म्हणून नोंदविण्यात आले होते. दरम्यान, गार वारे वाहत असल्याने मुंबईकरांनी कपाटातील लोकरीचे कपडे बाहेर काढले आहेत. काहीजण थंडीचा आनंद घेतानाही दिसत आहेत.
राज्यात काही ठिकाणी तीव्र गारठा आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर भागात पुणे, नाशिक आणि आसपासच्या परिसरात थंडीचा प्रभाव अधिक आहे. मुंबईचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास आहे. काही दिवस हा प्रभाव कायम राहील.- कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग
गारठलेली शहरे महाबळेश्वर ६.५नाशिक ६.६जळगाव ९.२मालेगाव ९.६बारामती १२.५पुणे १०.४चिखलठाणा १०.२परभणी १२.९नांदेड १४.६ठाणे १९मुंबई १५माथेरान ७.६डहाणू १३.६सोलापूर १४कोल्हापूर १६.१उस्मानाबाद १४.७जेऊर १२सांगली १६.४