Chetana Bhat Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे जगभर चाहते आहेत. शिवाय या कार्यक्रमामुळे प्रत्येक विनोदवीर घराघरात पोहोचला आहे. दरम्यान, याशोचे जगभर चाहते आहेत. हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांनाही संधी दिली. अभिनेत्री चेतना भट (Chetana Bhat) या कार्यक्रमातून लोकप्रिय झाली. उत्कृष्ट अभिनय आणि अफलातून अभिनयाने चेतना प्रेक्षकांना खळखळवून हसवते. स्किटमध्ये विविधांगी पात्र साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. सध्या सोशल मीडियावर चेताना भटने खास पोस्ट शेअर केली. या पोस्टची चांगलीच चर्चा आहे.
नुकतीच अभिनेत्री चेतना भटने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. गेल्यावर्षीच चेतनाने नवी कोरी कार घरी आणली होती. तिच्या त्या गाडीला १ वर्ष पूर्ण होताच लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "माझ्या आयुष्यात पंचला खूप महत्व आहे. स्किटमध्ये विनोदी पंच आणि प्रवासात टाटा पंच. जिने गेल्या वर्षभरात माझे सगळे हसरे रुसरे क्षण बघितलेत आणि मी जिच्या बरॊबर अनेक उतार चढाव अनुभवलेत अशी माझी टाटा पंच. माझ्या प्रत्येक ईमोशन्सची साक्षीदार. माझी पर्सनल स्पेस. जसं मी तिला हवं नको ते नियमित बघत असते तसंच ती ही मला लॉन्ग ड्राईव्ह करताना टी-ब्रेक ची आठवण करून देते. अशी मला जपणारी माझी सखी आज एक वर्षाची झाली." असं म्हणत चेतनाने सोशल मीडियावर तिच्या (सखी गाडी) सोबतचे काही खास फोटो पोस्ट केले आहे.
वर्कफ्रंट
चेतनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ती "चिकी चिकी बुबूम बुम" या चित्रपटात पाहायला मिळाली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात विविध विनोदी पात्र साकारताना दिसते. तिच्या अभिनयाचं अनेकदा कौतुक करण्यात आलं आहे.