फिल्डरपाड्याचा बच्चन गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचला. गौरवला या शोने लोकप्रियता मिळवून दिली. मेहनत, टॅलेंट आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने कलाविश्वात स्थान मिळवलं. गौरवचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो.
गौरव अबू धाबीला गेला आहे. तिथे तो व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अबू धाबीमध्ये तो वाळवंटातील सफर अनुभवत आहे. वाळवंटात व्हिडिओ शूट करताना गौरव सोबत एक मजेशीर प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओत गौरव अबू धाबीच्या वाळवंटात फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. तेवढ्यात मागून एक गरुड येऊन त्याच्या डोक्यावर बसत असल्याचं दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, गौरव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धीझोतात आला. 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये देखील तो सहभागी झाला होता. काही मराठी सिनेमांमध्ये तो झळकला आहे. अलिकडेच त्याचा 'संघी' हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला.