Join us

चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:59 IST

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. अनेक कलाकारांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. प्रसाद खांडेकरही हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचला. पण, प्रसादच्या अभिनय कारकीर्दीतील या प्रवासात त्याच्या पत्नीची त्याला भक्कम साथ मिळाली. नुकतंच प्रसादच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

प्रसादने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या पत्नीबरोबरच्या खास क्षणांचे फोटो आहेत. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

Happy anniversary बायको @alpatalekar

बस तू आहेस सोबत म्हणून तुझ्या साथीने एक एक टप्पा पार करतोय. अजून खुप टप्पे पार करायचेत ... जसं प्रोत्साहन देत पुढे ढकलतेस तसच प्रसंगी घट्ट पाय रोवून ठेहराव पण घ्यायला लावतेयस

प्रेमाची 9 वर्ष आणि लग्नाची 11 वर्षएकूण 20 वर्ष कशी गेलीत कळलं नाही ..

मित्रामधून प्रियकरप्रियकर मधून नवरानवऱ्या मधून बाप

एकांकिकेतून नाटकामध्येनाटकांमधून टेलिव्हिजन वरटेलिव्हिजन वरून सिनेमात

चाळीतून वन रुम किचन मध्येवन रुम किचन मधून 1 bhk मध्ये1 bhk मधून 2 bhk मध्ये

Best बस मधून बजाज चेतक स्कुटर वरबजाज चेतक स्कुटर वरून बजाज एव्हेंजरएव्हेंजर वरून फोर व्हीलर कार

ह्या आणि अश्या कित्येक प्रवासात सोबत राहिली आहेस ...म्हणून इथपर्यंत पोहोचलोय.I LOVE YOU SO MUCH MRS KHANDEKAR...अल्पा Happy anniversary अशीच सोबत राहा आणि हसत राहा. 

प्रसादच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद अभिनेता असण्याबरोबरच दिग्दर्शकदेखील आहे. लवकरच 'थेट तुमच्या घरातून' हे नवं नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत हे कलाकार दिसणार आहेत.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता