Join us

नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

By कोमल खांबे | Updated: March 16, 2025 15:46 IST

आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे.

नम्रता संभेराव ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी, हरहुन्नरी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे नम्रता घराघरात पोहोचली. उत्तम अभिनयाला विनोदाची सांगड घालत नम्रता प्रेक्षकांना खळखळवून हसवते. अभिनेत्रीच्या कलाविश्वातील यशात तिच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे. 

लेक रुद्राजच्या वाढदिवशी नम्रताची पोस्ट

माझ्या रुद्राजचा आज वाढदिवस ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा...

किती समजूतदार आहे रुद्राज अवघ्या 6 वर्षाचा मुलगा एवढा समजूतदार कसा काय असू शकतो ह्याचं मला खरंच नवल वाटत 🥰 🤩 त्याने फक्त बोलावं आणि आम्ही ऐकावं असं गोडुलं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलंय ह्याचा मला अभिमान आहे 🥰

रुद्राज : आई तू शूटिंगला असते नं तेव्हा मला तुझी खूप आठवण येते.मी : ठीक आहे, मग मी नाही जाणार कामावर तुझ्यासोबत रहाते दिवसभर...रुद्राज : नको आई मग तुला अवॉर्ड कसं मिळणार?

असे अनेक अविस्मरणीय क्षण रोज माझ्या नशिबात येतात रुद्राजमुळे ❤️ किती आणि काय कौतुक करू अजून तुझं...खूप मोठा हो यशस्वी हो आणि सगळ्यात महत्वाचं उत्तम माणूस हो 😇

मी : रुद्राज तू फक्त माझं बाळ आहेस.रुद्राज : नाही आई मी सगळ्यांचा आहे 😂😂😂😌😌त्यामुळे अश्या ह्या सगळ्यांच्या लाडोबाला खूप प्रेमआई love you ❤️

नम्रताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी रुद्राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, नम्रताने काही मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'नाच गं घुमा' सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.  

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रानम्रता आवटे संभेरावटिव्ही कलाकार