'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली. शिवालीला या शोने लोकप्रियता मिळवून दिली. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. शिवाली तिचे करिअर आणि पर्सनल लाइफमधील अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
शिवाली अनेकदा तिचे फोटो आणि रील व्हिडिओही शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेची टीम परदेशात गेली होती. लंडनमध्येही हास्यजत्रेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. लंडनच्या या ब्रीजवर शिवालीने रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. -३ डिग्री तापमानात शिवालीने रील बनवला आहे. तिच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवालीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, शिवालीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. अलिकडेच तिचा नवा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्येही शिवाली वेगवेगळे कॅरेक्टर साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असते. तिचं अवली लवली कोहली हे कॅरेक्टरही प्रचंड लोकप्रिय झालं आहे. गेली ९ वर्ष ती हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.