Join us

VIDEO : हिरवी गर्द झाडी, कौलारू घरं; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दाखवली गावची झलक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:48 IST

सध्या निखिलने सोशल मीडियावर त्याच्या कोकणातील गावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  

Nikhil Bane Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची लोकप्रियता जगभर आहे. या कार्यक्रमाप्रमाणे त्यातील कलाकार मंडळीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना एक सुवर्णसंधी मिळाली. त्यातूनच नावारूपाला आलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. विनोदाचं अचूक टायमिंग आणि चेहऱ्यावरील हावभाव या गोष्टींमुळे निखिल बने या कलाकाराने चाहत्यांची मनं जिंकली. 'भांडुपचा शशी कपूर' असं नाव त्याला या शोमुळे मिळालं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये निखिलची एक वेगळीच क्रेझ आहे. त्याची विनोदीशैली तसेच अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडतो. आपल्या विनोदी शैलीने हास्याचे फुलोरे उडवत त्याने प्रेक्षकांना कायमच खळखळून हसवलं. 

नुकताच निखिलने सोशल मीडियावर त्याच्या कोकणातील गावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. निखिल बने मुळचा चिपळूणचा आहे. तसेच तो कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो.  अलिकडेच त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नेटकऱ्यांना कोकणची सफर घडवली आहे. मुळात निखिल कोकणाचा असल्यामुळे तो वरचेवर गावी जात असतो. तिथली संस्कृती, परंपरा याची झलक त्याच्या व्हिडीओद्वारे चाहत्यांना पाहायला मिळत असते.

अशातच निखिलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या गावाची संपूर्ण झलक दाखवली आहे. व्हिडीओमध्ये हिरवी गर्द झाडी, कौलारू घरं असं निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतंय. अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या गावाकडील आठवणी ताज्या झाल्या आहेत. 'माझं गाव...' असं कॅप्शन देत निखिलने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिवाय हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्राकोकणचिपळुणसोशल मीडियासोशल व्हायरल