प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून लोकांच्या मनात खास घर केलंय. प्रियदर्शनीला आपण 'फुलराणी', 'नवरदेव' अशा विविध सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय. प्रियदर्शनीला अलीकडेच गाडी चालवताना मुंबई पोलिसांचा विलक्षण अनुभव आलाय. प्रियदर्शनीने व्हिडीओ शेअर करुन खास पोस्ट लिहीलीय.
प्रियदर्शनीने मुंबई पोलिसांसोबतचा अनुभव शेअर करुन म्हटलंय की, "मुंबईत आहे मी. सिग्नल व्यवस्थित पाळून सिग्नलवरुन पुढे गेल्यावर पोलिसांनी मला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. आणि माझी फाटली. त्यांच्या हातात फुलांचा गुच्छ होता. पुढे पोलिसांनी मला काच खाली करायला सांगितली. आणि ते म्हणाले की आज महिला दिन आहे. त्यामुळं आम्ही ज्या फिमेल ड्रायव्हर आहेत त्यांना फुल देऊन त्यांच्या गाडीसोबत एक फोटो काढतोय. पुढे त्यांनी मला फुल दिलं." असं म्हणत प्रियदर्शनीने मुंबई पोलिसांचे आभार मानले.
प्रियदर्शनीने पुढे पोलिस अधिकाऱ्यांचा फोटो पोस्ट करुन लिहीलं की, "खरंतर पोलिसांची भिती वाटण्याचं काही कारण नाहीय जोवर तुम्ही काही चुकीचं करत नाही." असं म्हणत प्रियदर्शनीने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. प्रियदर्शनीने शेअर केलेल्या या खास स्टोरीचं सर्वत्र खुप कौतुक होतंय.