'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रत्येक घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. या शोचे घराघरात चाहते आहेत. पडद्यावरील हास्यवीर अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. पण, पडद्यामागे मात्र वेगळी टीम काम करत असते. या टीमचा अविभाज्य भाग असलेले एक म्हणजे हास्यजत्रेचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी.
हास्यजत्रेतील इतर कलाकारांबरोबरच सचिन गोस्वामीदेखील चर्चेत असतात. त्यांनी आजवर 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर पत्नीबरोबरचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. "२९वर्षे सहजीवनाची... आनंदाची,समाधानाची...", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.
कोण आहे सचिन गोस्वामींची पत्नी?
सचिन गोस्वामींच्या पत्नीचं नाव सविता असं आहे. सविता या Clinical Psychologist आहेत. याशिवाय मुंबईतील टाटा मेमोरीअल हॉस्पिटलमध्ये त्या Psycho-Oncologist म्हणून नियुक्त आहेत. सचिन-सविता यांना एक मुलगाही आहे. या दोघांचा मुलगा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पडद्यामागे काम करतो.