Join us

"...म्हणून मी मालिकांमध्ये काम करत नाही", शिवाली परब म्हणाली- "महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:35 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली शिवाली अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र, मालिकांमध्ये ती काम करताना दिसली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिवालीने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली शिवाली अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र, मालिकांमध्ये ती काम करताना दिसली नाही. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं. शिवालीने 'सेलिब्रिटी कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. ती म्हणाली, "सध्या मी हास्यजत्रेमुळे बीझी आहे. खूपच बीझी आहे असं नाही. पण, हास्यजत्रा आणि सिरीयल असं एकत्र नाही करू शकत. आणि ज्या गोष्टीमुळे माझं आता सगळं व्यवस्थित आहे. ती गोष्ट सोडून मला सध्या पळत्याच्या मागे नाही लागायचं. कारण,  मला माहीत नाही की मालिकेत मी कशी वर्क होईन. ७ वर्ष हास्यजत्रा केल्यानंतर मला आता कुठे ते जमायला लागलं आहे. त्यामुळे मालिकेची गणितं कळायला मला वेळ लागेल. मग, पुन्हा त्यात मी डाऊन होऊन जाईन". 

"आता सध्या तरी बरीच कामं सुरू आहेत. मला झी मराठी, स्टार प्रवाहच्या अनेक मालिकांसाठी विचारणा झाली. पण, मीच नाही म्हणाले कारण मला हास्यजत्रा सोडायचं नाही. पुन्हा शूटिंगच्या तारखा आणि बाकीची कामं हे जमून येत नाही. म्हणून मी नाही म्हणते. पण, जर मला मालिकेत काम करायची इच्छा झाली तर व्हिलन साकारायला आवडेल", असंही तिने पुढे सांगितलं. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार