Join us

Exclusive : नवरी नटली ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील माय-लेकीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 4:10 PM

लेकीचं लग्न म्हणलं की आई तर भावूक होणारच. वनिताच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसतोय, तर आईच्या चेहऱ्यावर लेकीसाठीचं आनंद आणि समाधान दिसतेय.

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनी अर्थात वनिता खरात (Vanita Kharat) आज लग्नबंधनात अडकणार आहे. वनिताचे मेहंदी पासून ते हळदीपर्यंतटचे सगळे फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता वनीचा लग्नांच्या विधी सुरु होण्यापूर्वीचा आईसोबतचा गोड आणि हळव्या क्षणाच्या फोटो लोकमत फिल्मीच्या हाती लागला आहे. 

या फोटोत गळ्याला मुंडावळ्या साडी निसून वनी लग्नासाठी सज्ज झाली आहे. लग्नापूर्वी वनीने आईला घट्ट मिठी मारली आहे. माय लेकीच्या नात्यांमधला हा हळवा आणि गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वनिताच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसतोय, तर आईच्या चेहऱ्यावर लेकीसाठीचं आनंद आणि समाधान दिसतेय.  वनिता सुमितच्या साथीने आजपासून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. 

वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. दोघांचेही फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.   

वनिता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमासह 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या वनिताने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. कबीर सिंग या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. मोलकरणीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो आणि सनकी शाहिद तिच्यामागे रागाने धावत सुटतो,असा एक सीन या सिनेमात होता. या सीनमधील ती मोलकरीण कोण होती? तर ती वनिता खरात होती. कबीर सिंग या सिनेमात तिने शाहिदच्या मोलकरणीची भूमिका साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात होती.  ‘सरला एक कोटी’ चित्रपटातही ती झळकली होती. 

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रा